29 C
Mumbai
Wednesday, September 23, 2026
घरराजकारणभाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्याम सप्रे यांचे निधन

भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्याम सप्रे यांचे निधन

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

भारतीय जनता पार्टीचे कार्येकर्त व प्रदेश मीडिया विभागाचे सहसंयोजक श्रीपाद तथा श्याम सप्रे यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.

भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत सप्रे यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, सुनील कर्जतकर, चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, प्रदेश महामंत्री (मुख्यालय) अतुल वझे, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आदी उपस्थित होते.

पक्षासाठी कोणतेही काम करण्याची तयारी दाखवणारे सप्रे हे खरेखुरे कार्यकर्ते होते. या संकटाच्या काळात भारतीय जनता पार्टी सप्रे यांच्या कुटुंबियांच्या मागे उभी राहील, अशा शब्दांत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, ज्येष्ठ नेते रघुनाथ कुलकर्णी, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही मनोगत व्यक्त केले.

हे ही वाचा:

शिवसेनेच्या आमदारांना मुख्यमंत्री भेटत नव्हते…शिवसेनेच्या आमदारांनी लिहिले पत्र

एकनाथ शिंदेच्या बंडाची खेळी नेमकी कुणाची..

अफगाणिस्तानच्या कठीण काळात भारत त्यांच्या पाठीशी

शिवसेनेकडे उरले फक्त १४ आमदार

 

केंद्रीय रस्ते बांधणी व परिवहन मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही शोकसंदेशाद्वारे सप्रे यांना आदरांजली वाहिली.

अतिशय विनम्र, साधे आणि वयाच्या ७३ व्या वर्षी सुद्धा उत्साहाने, सातत्याने पक्षाचे काम करणारा कार्यकर्ता अशी श्याम सप्रे यांची ओळख होती. त्यांनी अनेक वर्षे विद्यार्थी परिषदेचे काम केले. हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेचे संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश मीडिया विभागात अनेक वर्षांपासून ते कार्यरत होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा