28 C
Mumbai
Sunday, January 29, 2023
घरराजकारणधरणबहाद्दराला गोमुत्र पाजा, भाजपाचे आंदोलन

धरणबहाद्दराला गोमुत्र पाजा, भाजपाचे आंदोलन

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता सर्व स्तरावर उमटू लागले आहेत. भाजपाने अजित पवार यांच्या त्या विधानावर टीका केली आहे. आता भाजपाच्या वतीने एक अनोखे आंदोलन करून अजित पवारांचा निषेध करण्याचे ठरविले आहे.

या गोमुत्रपाजा आंदोलनाच्या माध्यमातून अजित पवारांचा हा निषेध केला जाणार आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या ‘धरणबहाद्दराला गोमूत्र पाजा’ आंदोलन अशा घोषणेने हे आंदोलन ३ जानेवारी २०२२ सकाळी केले जाणार आहे.

सकाळी १०.३० वा. दादर स्टेशन पूर्व, कैलाश लस्सी समोरील चौक येथे हे आंदोलन होणार असून सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहून उग्र आंदोलनात सहभागी व्हा! असे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनात मुख्य वक्ता भाजपा मुंबईचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार असतील. मुख्य उपस्थिती आमदार प्रसाद लाड, आमदार कालीदास कोळंबकर, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, राजेश शिरवडकर जिल्हाध्यक्ष, श्रीनिवास शुक्ला, निरज उभारे, विलास आंबेकर (जिल्हामंत्री), विजय डगरे वडाळा विधानसभाध्यक्ष, बबलू पांचाळ- अणुशक्ती नगर विधानसभाध्यक्ष, राहूल वाळंज-चेंबूर विधानसभाध्यक्ष, संतोष गुप्ता सायन कोळीवाडा विधानसभाध्यक्ष, अक्षता तेंडूलकर माहिम विधानसभाध्यक्ष, गोवर्धन चौहान धारावी संयोजक यांचा सहभाग या आंदोलनात असेल.

हे ही वाचा:

छत्रपतींच्या वारसांकडून जनतेचा अपेक्षाभंग

राहुल गांधी नोटाबंदीविरोधातील मोहिमेबद्दल माफी मागणार का?

वीर सावरकर बॉक्सिंग क्लबचे जबरदस्त यश

विराट कोहली, रोहित शर्मा, के. एल. राहुल यांना संघात स्थान नाही

नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या टिप्पणीने वाद निर्माण झाला. संभाजीमहाराजांना धर्मवीर म्हणण्याची गरज नाही. ते स्वराज्यरक्षक आहेत. त्यांनी कुठल्याही धर्माचा प्रसार केला नाही, असे विधान अजित पवार यांनी केले होते. त्यावरून अजित पवारांवर भाजपाकडून टीका करण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,918चाहतेआवड दर्शवा
2,002अनुयायीअनुकरण करा
61,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा