35 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरराजकारणगांधीनगर महापालिकेत भाजपाच सरस

गांधीनगर महापालिकेत भाजपाच सरस

Google News Follow

Related

गुजरात राज्याची राजधानी असणाऱ्या गांधीनगर येथील महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने एकतर्फी विजय मिळवला आहे. ४४ जागांची क्षमता असणाऱ्या गांधीनगर महानगरपालिकेतील तब्बल ४१ जागांवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले आहेत. पुढल्या वर्षी होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणूकीचा विचार केला तर भाजपाचा हा विजय खूप महत्त्वाचा मानला जात आहे

मंगळवार, ५ ऑक्टोबर रोजी गांधीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागला. सकाळपासूनच या मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच भारतीय जनता पार्टी विजयाच्या दिशेने कूच करताना दिसून आली. ४४ जागांच्या या महापालिकेत भारतीय जनता पार्टीतर्फे सगळ्या जागांवर उमेदवार देण्यात आले होते. तर आम आदमी पक्षाने ४० जागा लढल्या होत्या. गांधीनगर महापालिका क्षेत्रात एकूण २.८ लाख नोंदणीकृत मतदार असून त्यापैकी ५६.२४% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

हे ही वाचा:

राज्याच्या गृहखात्यावर कशाचा ‘अंमल’ आहे?

शाळेत जाणाऱ्या शिक्षकांनाच झाली शिक्षा!

ईडीसमोर हजर राहण्यासाठी भावना गवळींना हवे अजून १५ दिवस!

मुंबई पालिका म्हणतेय, छट्, तिसरी लाट वगैरे काही येणार नाही!

त्यानंतर आज लागलेल्या निकालात भारतीय जनता पार्टीने गांधीनगर महापालिकेवर एक हाती आपला झेंडा फडकवल्याचे पाहायला मिळाले. तर काँग्रेसला दोन जागा आणि आम आदमी पक्षाला एकच जागा मिळाली. या निवडणुकीला घेऊन खूप मोठमोठ्या वल्गना केल्या होत्या. आम आदमी पक्ष गांधीनगरमध्ये सत्ता स्थापन करेल, एक हाती बहुमत मिळवेल असे पक्षातर्फे सांगण्यात येत होते. पण त्यांचा अवघा एक उमेदवार निवडून आल्यामुळे सोशल मीडियावर ते चांगलेच ट्रोल होताना दिसत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा