28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
घरराजकारणपोटनिवडणुकांत भाजपने दाखवली ताकद

पोटनिवडणुकांत भाजपने दाखवली ताकद

भाजपने त्रिपुरातील दोन्ही व उत्तराखंडमधील एकमेव जागा जिंकली आहे

Google News Follow

Related

सहा राज्यांतील सात विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत तीन जागांवर विजय मिळवून भाजपने आपली ताकद दाखवून दिली आहे. तसेच, नव्याने बनलेल्या विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. भाजपने त्रिपुरातील दोन्ही व उत्तराखंडमधील एकमेव जागा जिंकली आहे. मात्र उत्तर प्रदेशातील घोसी व झारखंडमधील डुमरी येथे विजय मिळू शकलेला नाही. तसेच भाजपने प. बंगालमधील जागाही गमावली आहे.

 

विधानसभा पोटनिवडणुका या साधारणत: स्थानिक राजकारणावर अवलंबून असतात. मात्र विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ आघाडी बनवल्यामुळे या पोटनिवडणुकांमध्ये विरोधी गट काय कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. उत्तर प्रदेश आणि झारखंडमधील जागा आधी ज्या पक्षाकडे होत्या, त्यांच्याकडेच राहिल्या. तर, झारखंडमधील डुमरी जागेवरून झारखंड मुक्ती मोर्चा आणि उत्तर प्रदेशातील घोसी जागेवरून समाजवादी पक्षाने विजय मिळवला. गेल्या वेळी घोसी जागेवरून जिंकलेले सपाचे आमदार दारा सिंह भाजपमध्ये गेले होते आणि भाजपच्या वतीने जागा लढवत होते. त्यामुळे ही पोटनिवडणूक महत्त्वाची होती. त्यात सपाचे उमेदवार जिंकले आणि भाजपचे दारासिंह पराभूत झाले.

 

हे ही वाचा:

जी-२० मध्ये पंतप्रधान मोदींकडून ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’चा मंत्र

जी-२० परिषदेच्या भारत मंडपममध्ये सजला कलामेळा

ईरशाळवाडी दुर्घटनेत शोध न लागलेल्या ५७ व्यक्तींच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदान देणार

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना सीआयडीकडून अटक

झारखंडमधील डुमरी जागेवर झारखंड मुक्ती मोर्चाचा विजय झाला. तेथे भाजपचा सहकारी पक्ष आजसूला पराभवाची चव चाखायला लागली. सपा व झामुमोने या विजयाला ‘इंडिया’ आघाडीचा विजय मानले आहे. मात्र प. बंगालमधील धूपगडी येथे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने कोणत्याही आघाडीशिवायच ही जागा भाजपकडून हिसकावून घेतली आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा पाठिंबा मिळालेला माकप तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्रिपुरामध्येही काँग्रेसने पाठिंबा दिलेल्या माकपच्या दोन उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. येथील बाक्सनगर जागेवर त्यांना भाजपकडून पराभव पत्करावा लागला. येथे भाजपने मुस्लिम उमेदवाराला रिंगणात उभे केले होते. ही चाल यशस्वी ठरली आणि भाजपचा विजय झाला. उत्तराखंडमधील बागेश्वर जागाही भाजप स्वत:कडे राखण्यात यशस्वी ठरली. केरळमध्ये काँग्रेसने पुतुप्पली जागा स्वत:कडे राखण्यात यश मिळवले.

 

पोटनिवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेने आपली करामत दाखवली. केरळमध्ये काँग्रेस नेता ओमान चंडी यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवरून त्यांचा मुलगा चांडी ओमान, उत्तराखंडमधील चंदनराम दास यांच्या निधनामुळे त्यांची पत्नी पार्वती दास आणि झारखंडमध्ये जगरनाथ महतो यांची पत्नी बेबी यांनी विजय मिळवला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
210,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा