29 C
Mumbai
Thursday, August 18, 2022
घरराजकारणचंदीगड महापालिकेत पुन्हा भाजपाचाच महापौर

चंदीगड महापालिकेत पुन्हा भाजपाचाच महापौर

Related

चंदीगड महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने आम आदमी पार्टीला चितपट केले आहे. भाजपाचे महापौर पदाच्या उमेदवार सरबजीत कौर यांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांनी आम आदमी पक्षाचे अंजू कट्याल यांचा पराभव केला आहे. त्यामुळे चंदीगड महापालिकेवर पुन्हा एकदा कमळ फुलले आहे.

काही दिवसांपूर्वीच चंदीगड महापालिकेची निवडणूक पार पडली असून या निवडणुकीच्या निकालाची चर्चा देशभर होताना दिसली. ‘आप’ ने या निवडणुकीत चांगलीच मुसंडी मारलेली पाहायला मिळाली. चंदीगड महापालिकेच्या अंतिम निकालानंतर महापालिकेतील पक्षीय बलाबल हे त्रिशंकू स्थितीत नेणारे होते. भाजपाचे १४ नगरसेवक, आपचे १४ नगरसेवक अशा प्रकारचे हे बलाबल राहिले तर ७ जागा या काँग्रेस पक्षाला आणि एक जागा शिरोमणी अकाली दल या पक्षाला मिळाली.

हे ही वाचा:

पाच राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमांची थोड्याचवेळात घोषणा

नागालँडमध्ये आढळला वेगळाच बिबट्या

आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी

… म्हणून सोनू सूदने पंजाबचे ‘स्टेट आयकॉन’पद सोडले

त्यामुळे कोणत्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने पंजाब महापालिकेत महापौर कोणाचा बसणार? यासाठी चुरस असणे स्वाभाविक होते. सर्वाधिक जागा मिळवून भाजप आणि आप हे दोन्ही पक्ष आपला महापौर बसवण्यासाठी प्रयत्नशील होते. तर काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल नेमक्या काय भूमिका घेणार? याकडेही लक्ष लागून राहिले होते.

अशातच काँग्रेस आणि अकाली दल या दोन्ही पक्षांनी मतदानाला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या निवडणुकीतील नाट्य अधिकच वाढले होते. अशा परिस्थितीत महापौर निवडणुकीत भाजपने ‘आप’ला १४ – १३ असे एका मताच्या फरकाने हरवले आहे. या निवडणुकीत एक मत बाद ठरवले असल्यामुळे भाजपाने अवघ्या एका मताच्या फरकाने हा विजय मिळवला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,912चाहतेआवड दर्शवा
1,918अनुयायीअनुकरण करा
23,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा