29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरराजकारणभाडोत्री गुंडांनी असभ्य वर्तन, शिवीगाळ केल्याची भाजपा महिला नगरसेविकांची तक्रार

भाडोत्री गुंडांनी असभ्य वर्तन, शिवीगाळ केल्याची भाजपा महिला नगरसेविकांची तक्रार

Google News Follow

Related

मुंबई महानगरपालिकेतील भाजपा महिला नगरसेविकांना भाडोत्री गुंडांनी धक्काबुक्की, शिवीगाळ आणि त्यांच्याशी असभ्य वर्तन केल्याची तक्रार नगरसेविकांनी राज्य महिला आयोगाकडे केली आहे. महिला आयोगाच्या प्रमुख रुपाली चाकणकर यांच्याकडे अशी लेखी तक्रार या नगरसेविकांनी केली आहे.

या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, मुंबई महानगरपालिकेचे सभागृह सर्वसाधारण सभेसाठी भायखळा पूर्व जिजामाता उद्यान येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृह भरले होते. सभागृहात विविध विषयांवर सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात मतभिन्नता असल्यामुळे वादविवाद झालेत. नायर रुग्णालयातील ३० नोव्हेंबर २०२१ रोजी झालेला चार महिन्याच्या बालकाचा मृत्यू या विषयावर आम्ही सभा तहकुबी मागितली. या विषयावर बोलताना विषयाचे गांभीर्य ओळखून सर्व पक्षीय नगरसेवक विषयाचे संबंधी व रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजी, बेपर्वा कारभारावर टीका करत होते. परंतु यावेळी बोलताना सभागृहातील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी विषय सोडून राजकारणाला हात घातला आणि भाजप संबंधी तसेच ज्या भाजपच्या सदस्यांनी आरोग्य समितीचा राजीनामा दिलेला आहे त्यांच्याबाबत असभ्य भाषेत बेताल वक्तव्य केले. गळा दाबून टाकावासा वाटतो…चल हट…जा जा..असे हातवारे करत असभ्य वर्तन आणि बेताल वक्तव्य केले. यामुळे सभागृहात मोठा गोंधळ उडाला. आम्ही यशवंत जाधव यांनी माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. याचाच राग मनात धरून यशवंत जाधव यांनी त्याचा बदला सभागृहाबाहेर रस्त्यावर घेण्याचे ठरविले असावे असे वाटते. रात्री साडेनऊ वाजता सभागृह संपल्यानंतर आम्ही सर्व महिला अण्णा भाऊ साठे सभागृह आवाराबाहेर पडल्यावर प्रवेशद्वारावर मोठा घोळका उभा होता. त्यात काही शिवसेनेचे नगरसेवक आणि नगरसेविका होत्या. परंतु सत्तर ते ऐंशी अनोळखी चेहरे होते. या अनोळखी चेहऱ्यामध्ये महिला व पुरुष होते. हे सर्व नगरसेवक अथवा त्यांचे सहकारी नव्हते.

गेली साडेचार वर्षे आम्ही महापालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत असल्यामुळे आम्ही सर्वच नगरसेवकांना ओळखतो. परंतु हे ७०/८० जण हे पूर्णपणे अनोळखी होते. आणि ते साधारणता गुंड प्रवृत्तीचे बॉक्सर प्रकारचे होते. आम्ही प्रवेशद्वाराबाहेर पडताच आम्हाला शिवसेनेच्या नगरसेवक- नगरसेवकांनी गराडा घातला आणि घोषणायुद्ध सुरु झाले. त्याचवेळी या अनोळखी भाडोत्री गुंड पुरुषांनी आम्हा महिलांना धक्काबुक्की गेली. शिवीगाळ केली. अंगाला हात लावला, विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कसेबसे आम्ही तिथून बाहेर पडलो. आमची तक्रार या भाडोत्री अनोळखी गुंड पुरुष व महिलांबाबत तसेच त्यांनी केलेल्या धक्काबुक्की शिवीगाळ आणि विनयभंगाच्या प्रकाराबाबत आहे. या भाडोत्री गुंडांना ज्यांनी तिथे बोलवून सदर कटकारस्थान केले त्यांच्याबाबत आमची तक्रार आहे. सदर भाडोत्री गुंड हे भायखळा परिसरात राहणारे होते असे त्यांच्या बोलण्यावरून ध्वनित झाले. त्यांनी आम्हाला परत भायखळ्यात यायचय ना आणि परत घरी जायचय ना अशी धमकी दिली त्यामुळेच हे भाडोत्री गुंड स्थानिक नगरसेवक यशवंत जाधव यांच्या सांगण्यानुसार तेथे जमा झाले असावेत. आणि या कटकारस्थानाचे सूत्रधार यशवंत जाधव, अध्यक्ष – स्थायी समिती हेच असावेत असा आम्हाला दाट संशय आहे.

हे ही वाचा:

बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला घातपात की अपघात?

‘शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणे हा निजामशाही कारभार’

इम्रान खानच्या ‘नया पाकिस्तान’ची ही दशा

भारतात जगातील सर्वाधिक महिला वैमानिक

 

मुंबई शहरात महिला नगरसेविका सुरक्षित नसतील लोकशाही मार्गाने, लोकशाहीच्या मंदिरात, महापालिका सभागृहात आवाज उठविण्याचा प्रयत्न केलेल्या महिला नगरसेविकांचा गळा आणि आवाज दाबण्याचा प्रयत्न भर रस्त्यावर अशा प्रकारे होणार असेल तर हे महाराष्ट्र राज्य सरकारच्या कायदा व सुव्यवस्थेस भूषणावह नाही म्हणून आम्ही सदर घटनेच्या विरोधात महाराष्ट्र पोलिसांनी कठोर कारवाई करावी यासाठी सदर तक्रार दाखल केलेली आहे. महिलांवरील या दादागिरी, गुंडगिरी, शिवीगाळ, धक्काबुक्की व विनयभंगाची तक्रार आम्ही महिलांना न्याय देणारा आयोग म्हणून राज्य महिला आयोगाकडे करीत आहोत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा