26 C
Mumbai
Tuesday, October 4, 2022
घरराजकारण'उद्धव यांचे अस्तित्व संपले, आहे ते फक्त मातोश्रीपुरते'

‘उद्धव यांचे अस्तित्व संपले, आहे ते फक्त मातोश्रीपुरते’

नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला घणाघात

Related

उद्धव ठाकरे यांचं अस्तित्व कुठे आहे? ते फक्त मातोश्रीच्या कक्षेत आहेत, अशी बोचरी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. उद्धव ठाकरे कधीही चांगलं बोलू शकत नाहीत असंही यावेळी नारायण राणे म्हणाले आहेत.

काल पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशात चित्ते आणण्यात आले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. त्या टीकेला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चांगल्या गोष्टींचं कौतुक करावं. देशात जे चित्ते उपलब्ध नव्हते ते पंतप्रधान मोदी यांनी उपलब्ध करून दिले. त्यामुळे त्यांचे धन्यवाद मानले पाहिजेत. पण काही लोकांना चांगलं बोलता येत नाही, असे नारायण राणे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे यांचं अस्तित्व आहेच कुठे? ज्या दिवशी ते मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले त्याच दिवशी त्यांचे अस्तित्व संपले. त्यांचे अस्तित्व फक्त मातोश्रीपुरतेच मर्यादित आहे. राज्यात देशात उद्धव ठाकरे यांच अस्तित्व कुठेही नाही. त्यांचं अस्तित्व फक्त मातोश्रीच्या कक्षेत आहे, असा घणाघात राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

हे ही वाचा:

हॉस्टेलमधील ‘त्या’ मुलींचे व्हिडीओ काढणाऱ्या मुलीला शिक्षिकेने विचारला जाब

राज ठाकरेंनी विदर्भात निवडणूक तयारीचे दिले आदेश

मोदींच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा जागतिक विक्रम

होस्टेलमधील ६० मुलींचे व्हिडीओ व्हायरल, आठ जणींचा आत्महत्येचा प्रयत्न

दसरा मेळाव्याबद्दल बोलताना नारायण राणे म्हणाले, मेळावा कोणाचा होणार याचा निर्णय न्यायालयात होणार आहे. तो निर्णय शिंदे गटाच्या बाजूने लागणार आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी शिंदे गटाला मिळायला हवी. तसेच धनुष्यबाण निशाणी शिंदे गटालाच मिळणार आहे, असंही राणे म्हणाले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,969चाहतेआवड दर्शवा
1,946अनुयायीअनुकरण करा
42,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा