31 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरराजकारणअभिरूप विधानसभेतून घुमला ठाकरे सरकारच्या निषेधाचा सूर

अभिरूप विधानसभेतून घुमला ठाकरे सरकारच्या निषेधाचा सूर

Google News Follow

Related

तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी काल भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केलं. त्यामुळे भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजपने थेट विधानसभेबाहेर प्रतिविधानसभा भरवून सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या निषेधाचा प्रस्ताव मांडला आणि त्यावर चर्चा सुरू झाली.

विधानसभेचा पहिला दिवस आमदारांच्या निलंबनावरून गाजला. आज दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी विरोधक सभागृहात उपस्थित राहून गोंधळ घालतील असे संकेत होते. मात्र, भाजप आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत थेट विधानसभेच्या पायरीवरच अभिरुप विधानसभा भरवण्यात आली. भाजपचे आणि भाजपच्या मित्रपक्षाचे सर्वच आमदार विधानसभेच्या पायरीवर बसले होते.

चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार आणि राधाकृष्ण विखे-पाटील आजूबाजूलाच बसले होते. यावेळी ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांना अभिरुपी विधानसभाचे अध्यक्ष करण्यात आले. त्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस बोलायला उभे राहिले. यावेळी त्यांनी काल झालेला प्रकार या अभिरुप विधानसभेच्या अध्यक्षांच्या लक्षात आणून दिला. तसेच सरकारच्या निषेधाचा आणि धिक्काराचा प्रस्ताव मांडला. हे सरकार जुल्मी सरकार आहे. वसुली सरकार आहे. हे भ्रष्टाचारी सरकार आहे. त्याचा आम्हाला पर्दाफाश करायचा आहे, असं फडणवीस म्हणाले. तसेच या अभिरुप विधानसभेत काही सदस्य बोलणार असून त्यांना बोलण्याची संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

फडणवीस जागेवर बसल्यानंतर अध्यक्ष कोळंबकर यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांचं नाव पुकारलं. विखे-पाटलांनी सुमारे दहा ते पंधरा मिनिटं भाषण केलं. हे सरकार चर्चेतून पळ काढत आहे. त्यांना जनतेच्या प्रश्नाशी घेणंदेणं नाही. लोकशाहीच्या मंदिरात विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचं काम करण्याचं काम हे सरकार करत आहे, असा आरोप करतानाच विखे-पाटलांनी या सरकारचा निषेध नोंदवला. त्यानंतर जयकुमार गोयल यांनी भाषणाला सुरुवात करत राज्य सरकारच्या निलंबनाच्या कारवाईवर जोरदार टीका केली. त्यानंतर हरिभाऊ बागडे यांनीही या चर्चेत भाग घेऊन सरकारवर सडकून टीका केली.

हे ही वाचा:

भास्कर जाधव नरकासूर, तर उद्धव ठाकरे सोंगाड्या

१२ आमदारांच्या निलंबनाविरुद्ध भाजपाचे राज्यभर आंदोलन

‘शिवीगाळ’-‘निलंबन’ ‘नाट्या’नंतर भास्कर जाधवांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

तुमच्या ‘बां’चं नाही, आमच्या ‘दिबां’चं नाव हवं

अध्यक्षाच्या दालनात विरोधकांना बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणायची असते. मात्र, काल त्यांनी आमदारांना निलंबित करण्याचं ठरवलं होतं. त्यासाठी ते कारण शोधत होते. सभागृहात गोंधळ झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी उभं राहून परिस्थिती निवळायची असते. पण आमचे मुख्यमंत्री हललेच नाही. अर्धपुतळा ठरावा असं मुख्यमंत्री बसले होते, अशी टीका हरिभाऊ बागडे यांनी केली. मुख्यमंत्री दोन्ही सभागृहाचे प्रमुख असतात. त्यामुळे सभागृहाची परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम त्यांनी करायचं असतं, असं ते म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा