38 C
Mumbai
Monday, March 9, 2026
घरराजकारणवसई- विरार महापालिकेत आता भाजपचा आवाज घुमणार!

वसई- विरार महापालिकेत आता भाजपचा आवाज घुमणार!

Google News Follow

Related

भारतीय जनता पक्षाचे अभ्यासू आणि अनुभवी नेते मनोज पाटील यांची अखेर अपेक्षेप्रमाणे वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेते पदी वर्णी लागली आहे. त्यांच्या या निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, काल 26 फेब्रुवारी रोजी पालिका मुख्यालयातील त्यांच्या दालनाचा (कार्यालयाचा) विधिवत पूजाविधीने उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

या उद्घाटन सोहळ्याला वसई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार स्नेहाताई दुबे-पंडित आणि नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. दोन्ही लोकप्रतिनिधींच्या हस्ते कार्यालयाचे पूजन करून मनोज पाटील यांनी आपल्या नवीन पदाचा कार्यभार स्वीकारला.

या वेळी भारतीय जनता पक्षाचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन मनोज पाटील यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. केवळ राजकीय क्षेत्रातीलच नव्हे, तर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या दालनाला सदिच्छा भेट देऊन पाटील यांचे स्वागत केले.

या प्रसंगी बोलताना आमदार राजन नाईक यांनी भाजपच्या आगामी रणनीतीवर प्रकाश टाकला. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून वसई-विरार क्षेत्रांत राबवले जाणारे विविध प्रकल्प आणि प्रस्तावित विकासकामांची त्यांनी इत्थंभूत माहिती दिली. भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून येत्या काळात शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मनोज पाटील यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे महापालिकेत विरोधी पक्षाची बाजू अधिक प्रभावीपणे मांडली जाईल आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळेल, अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा