28.3 C
Mumbai
Monday, July 27, 2026
घरराजकारणकॉक्रोच आंदोलक आपल्या नावाप्रमाणेच दिसतात आणि वागतात!

कॉक्रोच आंदोलक आपल्या नावाप्रमाणेच दिसतात आणि वागतात!

सीजेपी आंदोलनावर कंगना रणौत यांची टीका

Google News Follow

Related

भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) आंदोलनावर तीव्र टीका केली आहे. आंदोलनातील व्हायरल व्हिडिओंचा उल्लेख करत त्यांनी आंदोलकांच्या भाषेवर, वर्तनावर आणि आंदोलनाच्या स्वरूपावर आक्षेप घेतला.

इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये कंगना रणौत यांनी लिहिले की, “माझ्या आयुष्यात मी इतका विद्रूपपणा एका ठिकाणी कधीच पाहिलेला नाही. त्यांनी पुढे म्हटले की, “ते ज्या प्रकारे बोलतात आणि ज्या प्रकारची भाषा वापरतात, ती प्रत्येक दृश्यात अत्यंत धक्कादायक आणि अश्लील वाटते. अशा लोकांना जन्माला कोण घालते आणि त्यांचे संगोपन कोण करते?”

हे ही वाचा:

‘नीट’ परिक्षेत फक्त ११ गुणांनी कटऑफ हुकल्याने विद्यार्थीनीने जीवन संपवले

“आंदोलन झाले म्हणून लाठीमार करण्याचा अधिकार नाही”

तांदळातील खडे काढण्याचे काम

वैभव सूर्यवंशीला ईशानचा गुरुमंत्र

भारत हा विविधतेने नटलेला, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि सुसंस्कृत देश असल्याचे सांगत त्यांनी सीजेपीवर निशाणा साधला. “तुम्ही स्वतःला ‘कॉक्रोच’ म्हणवता आणि तसेच दिसता व वागता देखील. यात कोणताही विरोधाभास नाही. तुम्ही जगासमोर केवळ घाण, कचरा आणि विद्रूपपणा मांडत आहात,” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले.

कंगना रणौत यांनी आंदोलनातील व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाल्याचे सांगत, “मला आता स्वतःला सावरण्यासाठी थोडा वेळ आणि डिजिटल डिटॉक्सची गरज आहे,” असेही नमूद केले.

संसदेतील गदारोळावरही विरोधकांवर निशाणा

याआधी दिवसभरात कंगना रणौत यांनी सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांचा प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक, २०२६ संसदेत मांडण्याच्या वेळी विरोधकांनी केलेल्या गदारोळावरही टीका केली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी आरोप केला की, विरोधक जाणूनबुजून शैक्षणिक सुधारणा रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी जणू ठरवले आहे की सत्ता मिळेपर्यंत संसद चालू द्यायची नाही, मग विषय कितीही महत्त्वाचा असो, असे त्या म्हणाल्या.

शिक्षण क्षेत्रातील सुधारणा करणाऱ्या विधेयकालाही विरोधकांनी विरोध केल्याचा आरोप करत त्यांनी देशाने याची नोंद घ्यावी, असेही म्हटले. जनतेने त्यांना बहुमत दिले नाही, त्यामुळे देशात कोणतेही काम होऊ नये, अशी त्यांची भूमिका दिसते, असा आरोप कंगना रणौत यांनी केला.

सध्या परीक्षा सुधारणा विधेयक आणि विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस कारवाईच्या मुद्द्यावर केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये तीव्र राजकीय संघर्ष सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
323,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा