27.7 C
Mumbai
Sunday, July 26, 2026
घरराजकारणराहुल गांधी घातपात घडवू इच्छित होते...शिंदेंचा घणाघाती आरोप

राहुल गांधी घातपात घडवू इच्छित होते…शिंदेंचा घणाघाती आरोप

उद्धव ठाकरेंनीही आंदोलनात पेटवापेटवीची भाषा केल्याचाही केला आरोप

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर केलेल्या आंदोलनावरून शिंदे यांनी वक्तव्य केले आहे.

शिंदे म्हणाले की, “प्रधानमंत्री निवासाच्या परिसरामध्ये कुठलेही आंदोलन करता येत नाही. ही माहिती या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना असताना सुद्धा जाणीवपूर्वक तिथं आंदोलन केलं गेलं. हजारो लाखो लोकांना तिकडे बोलावणं याचा अर्थ काय? याचा अर्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानांमध्ये घातपात घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांचा हेतू होता. ते नेहमी बांगलादेश होणार म्हणतात. नेपाळ होणार म्हणतात. देशामध्ये अराजकता पसरवणं हा त्यांचा उद्देश होता. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हे ही वाचा:

स्नॅचमध्ये विक्रम, ऋषिकांतची रौप्यमयी कामगिरी!

चीनचे मनसुबे नापास होतोय ‘शिंकू ला पास’

आता पंजाबच्या शिक्षणमंत्र्याचा हवाय राजीनामा!

अनाहत सिंहची विश्वविजेती झेप

एकनाथ शिंदे यांनी आरोप केला की, पंतप्रधानांच्या घराबाहेर आंदोलन करणे हे निंदनीय आहे.  यापूर्वी देखील आपण दोन देशाचे प्रधानमंत्री गमावलेले आहेत. आणि म्हणून याचा मी अतिशय कठोर शब्दात निषेध करतो. कारण ते विरोधी पक्ष नेते असताना ते स्वतः सगळ्यांना आवाहन करत होते. मग तिकडे आंदोलन करण्यामागचा त्यांचा दुष्ट हेतू होता.  ही फार गांभीर्याने घेण्याची बाब आहे.

उद्धव ठाकरेंना टोमणा

या आंदोलनात महाराष्ट्रासह इतर राज्यातील विरोधी पक्षनेतेही सहभागी झाले. उद्धव ठाकरेंनीही अभिजित दीपकेची भेट घेतली. आंदोलनाला पाठिंबा दिला. त्याबद्दल शिंदे म्हणाले की, काही लोक इकडून पण आंदोलनात गेले. ज्यांना महाराष्ट्रातल्या लोकांनी ठोकारलं, नाकारलं. ते त्यांच्या विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर जाऊन पेटवापेटवीची भाषा करत होते. आता आग लागलेली आहे. विझून देऊ नका. हे काय आहे? देशामध्ये अराजकता पसरवण्याचा तुमचा प्रयत्न आहे. पण विद्यार्थ्यांचं आंदोलन संपल्यामुळे ते निराश झालेले आहेत.  ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ अशा प्रकारचा हा विषय आहे. विद्यार्थ्यांच्या बरोबर आम्ही आहोत. विद्यार्थ्यांच्या बरोबर आमच्या संवेदना आहेत. विद्यार्थी हे देशाच भवितव्य आहे आणि विद्यार्थ्यांच्या पाठीमागे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पण आहेत.

खरं म्हणजे नीट पेपर लीक होणं ही देखील दुर्दैवी घटना घडली. त्या घटनेचं गांभीर्य या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी ओळखलं. त्यांनी तात्काळ यामध्ये नवीन कायदा करण्याचा निर्णय घेतला. त्याच विधेयकही उद्या येईल, असंही शिंदे म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
323,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा