31 C
Mumbai
Monday, October 12, 2026
घरविशेषकोकण आणि विदर्भाच्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

कोकण आणि विदर्भाच्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

मुंबई-मडगाव, मुंबई-नागपूरदरम्यान ८ विशेष गाड्या

Google News Follow

Related

सुट्टीच्या काळात वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई-मडगाव आणि मुंबई-नागपूरदरम्यान आठ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकण तसेच विदर्भाच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या विशेष गाड्यांच्या एकूण आठ सेवा २ आणि ४ ऑक्टोबर २०२६ रोजी धावणार आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव मार्गावर चार विशेष सेवा चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०१०२९ लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २ आणि ४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.२५ वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी ३.१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१०३० मडगाव येथून २ आणि ४ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. या गाड्यांना ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी यांसह कोकणातील विविध स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
सुरत-उदयपूरदरम्यान धावणार वंदे भारत एक्स्प्रेस

बिहारमध्ये अधिकारी असलेल्या दांपत्याकडे कोट्यवधींचे दागिने, घड्याळे, १ कोटी रोख

तिरंदाजीत भारताची सुवर्णहॅट्ट्रिक

कुलदीप यादवचा ऐतिहासिक विक्रम

दुसरीकडे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूरदरम्यान चार साप्ताहिक सुपरफास्ट विशेष सेवा चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०२१४१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २ आणि ४ ऑक्टोबर रोजी रात्री १२.२५ वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी ३.३५ वाजता नागपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०२१४२ नागपूर येथून दुपारी ४.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ९.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. या गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे देण्यात आले आहेत. गाडी क्रमांक ०२१४२ ला इगतपुरी येथेही थांबा असेल.

या विशेष गाड्यांना चार वातानुकूलित तृतीय श्रेणी, ११ शयनयान, पाच सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन द्वितीय आसनांसह गार्ड्स ब्रेक व्हॅन अशी संरचना असेल. विशेष गाडी क्रमांक ०१०२९, ०२१४१ आणि ०२१४२ साठी आरक्षण १ ऑक्टोबर २०२६ पासून सर्व पीआरएस केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. अनारक्षित डब्यांसाठी युटीएस प्रणालीचा वापर करता येणार असून, प्रवासी तिकीट बुकिंगसाठी ‘रेलवन’ ॲपचाही वापर करू शकतात. विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा एनटीईएस ॲपवर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा