30 C
Mumbai
Saturday, March 25, 2023
घरराजकारणमहापालिकेसाठी भाजप मिशन १५० घोषित

महापालिकेसाठी भाजप मिशन १५० घोषित

शेलारांनी उद्धव ठाकरेंवर केली बोचरी टीका

Google News Follow

Related

मुंबईत होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत त्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. पण आता मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपने आपले ‘मिशन १५०’ जाहीर केले आहे. महापालिकेच्या या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप आमनेसामने येणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई भाजपची आज कार्यकारिणी बैठक पार पडली . आज दादर येथे पार पडलेल्या या महत्वपूर्ण बैठकीला भाजप पक्षातील सर्व नगरसेवक, आमदार, खासदार, आणि मुंबईचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. याच बैठकीत मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपने मिशन १५० ठरवले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मिशन १५० चीच चर्चा चालू आहे.

सध्या प्रत्येक पक्ष महापालिका निवडणुकीसाठी आपली रणनीती ठरवत आहे. भाजपच्या या बैठकीला भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई प्रदेश भाजपा कार्यकारिणी बैठक झाली यात भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,पूनम महाजन यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळे आजपासून भाजपचे मिशन १५० ला आजपासून सुरवात झाल्याचे बोलले जाते.

आशिष शेलार काय म्हणाले    

भाजपसोबत तुम्ही गद्दारी केली तेव्हापासून त्यांच्याकडे ना नेतृत्व आहे ना मतदार आहेत, ना आमदार . ‘आज मतांसाठी त्यांना दारोदारी कटोरा घेऊन फिरावे लागत आहे’ अशी टीका मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी शिवसेनेवर केली आहे. आपण जनतेच्या सेवेत असून मुंबईकर हे पाहत आहेत.  त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपचे १५० नगरसेवक मुंबई महापालिकेत विजयी होतील आणि महापौर भाजपाचाच होणार असा विश्वास सुद्धा त्यांनी या वेळेस व्यक्त केला. ज्याप्रमाणे राज्यसभेत पंतप्रधान मोदी अकेला सबको भारी पड रहा है त्याचप्रमाणे मुंबईत सुद्धा एक मोदी सगळ्यांना भारी पडेल असा टोलाही विरोधकांना लगावला.

हे ही वाचा:

मुंबईवरून ‘एक्सप्रेस वे’ने २४ नाही तर १२ तासांत गाठा दिल्ली

राष्ट्रवादीला अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याचे डोहाळे.. पण शरद पवार म्हणाले

फिरकीच्या जाळ्यात कांगारू फसले; भारताचा डावाने विजय

महान दूरदर्शी व्यक्तिमत्व पंडित दीनदयाळ उपाध्याय

कार्यकारिणी बैठकीत काय झाले ?
भाजपने आपले १५० नगरसेवक जिंकून येण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि नेत्यांना मार्गदर्शन केले. शिवसेनेच्या कार्यकाळात झालेला भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा ठराव मांडण्यात आला. त्याप्रमाणे प्रत्येक विभागात जाऊन हा ठराव मांडण्यात येईल. प्रत्येक वॉर्डमध्ये विरोधकांनी केलेली चुकीची कामे लोकांच्या निदर्शनास आणून देणार. राज्य आणि केंद्र सरकारचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आपल्या वॉर्डात मूलभूत सोयी सुविधा लोकांना मिळाल्यात का हे पाहून त्या मिळाल्या नसल्यास आपल्या मार्फत पोहोचावा.

ज्या वॉर्ड मध्ये आपल्या पक्षाची ताकद नाही तिकडे पक्ष संगठन करून विविध कार्यक्रम आखून पक्ष संगठन करणार. जिथे भाजपचा नगरसेवक तिथे भाजपचा उमेदवार दिला जाईल. तर जिथे सेनेचा तिथे शिंदे गट किंवा आपला चांगला उमेदवार देऊ. इतर पक्षाचे नगरसेवक आहेत. तिथे कार्यकर्त्यांनी आपला जोर लावावा. त्या जागा आपण लढवू याशिवाय मी या माहिती तंत्रं ज्ञानाच्या युगात सर्व कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर भर देण्याचे सांगितले आहे.
या बैठकीत आगामी निवडणुकीत भाजपने जे लक्ष्य निश्चित केले आहे ते कसे सध्या होईल याची गोळाबेरीज विनोद तावडे, चन्फद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांनी सांगितले.

 

 

 

 

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,880चाहतेआवड दर्शवा
2,037अनुयायीअनुकरण करा
65,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा