25 C
Mumbai
Thursday, March 30, 2023
घरविशेषमुंबईवरून 'एक्सप्रेस वे'ने २४ नाही तर १२ तासांत गाठा दिल्ली

मुंबईवरून ‘एक्सप्रेस वे’ने २४ नाही तर १२ तासांत गाठा दिल्ली

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवार १२ फेब्रुवारी रोजी दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेचे उद्घाटन होणार आहे. एक्सप्रेस वेचा पहिला टप्पा सुरु होत आहे.  दिल्ली, राजस्थानसह देशातील अनेक राज्यांमधून जाणारा हा एक्स्प्रेस वे देशातील सर्वात लांब एक्स्प्रेस वे आहे. याची १,३८६ किमी आहे. हे देशाची राजधानी दिल्लीला आर्थिक राजधानी मुंबईशी जोडणारा हा महत्वाचा एक्सप्रेस वे आहे.. हा एक्स्प्रेस वे दिल्लीसह हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र अशा ६ राज्यांमधून जाणार आहे. या एक्स्प्रेस वेवर रेस्टॉरंट्स, टॉयलेट, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स आणि इतर सुविधा असतील. एक्स्प्रेस वेच्या निर्मितीनंतर दिल्ली-जयपूर महामार्गावरील वाहतूक कोंडीतुन मुक्तता होणार आहे.

एक्स्प्रेस वेच्या बांधणीसाठी २५ लाख टन कोळशाचा वापर करण्यात आला आहे. आहे. याशिवाय चार हजार प्रशिक्षित अभियंते या एक्स्प्रेस वेच्या बांधकामात गुंतले होते. हा चार मार्गिका असलेला एक्स्प्रेस वे २४ तासांत २.५ किमीपर्यंत बांधून एक जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. त्याच बरोबर ५० किमीच्या एकेरी मार्गिकेत १०० तासांत जास्तीत जास्त कोळसा टाकण्याच्या विश्वविक्रमाचीही नोंद झाली आहे. . नितीन गडकरी यांनी ही माहिती #BuildingTheNation ला टॅग केली.

हे ही वाचा:

महान दूरदर्शी व्यक्तिमत्व पंडित दिनदयाळ उपाध्याय

फक्त ५०० रुपये दिले नाहीत म्हणून केला खून

रोहित पवारांनी राहुल-राऊतांना खुळ्यात काढले?

उद्धव ठाकरेंच्या शब्दाला किंमत राहिली नाही का?

प्रवासाचा वेळ २४ तास नाही १२ तासावर
या एक्स्प्रेस वेच्या प्रवासादरम्यान दिल्ली-मुंबई प्रवासाचा वेळ २४ तासांवरून केवळ १२ तासांवर येणार आहे. या एक्स्प्रेस वेवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक ५०० मीटरवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या एक्स्प्रेस वेचे बांधकाम ९ मार्च २०१९ रोजी सुरू झाले. पण कोविडच्या काळात लॉकडाऊनमुळे त्याचे बांधकाम थांबले होते.

जगातील सर्वात वेगवान विकसित एक्सप्रेसवे
या द्रुतगती मार्गामुळे जवळपासच्या सर्व क्षेत्रांच्या विकासावर मोठा प्रभाव पडेल. त्यामुळे देशाच्या आर्थिक परिवर्तनात मोठा हातभार लागेल. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग हा “जगातील सर्वात वेगवान विकसित एक्सप्रेसवे असेल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,877चाहतेआवड दर्शवा
2,034अनुयायीअनुकरण करा
65,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा