31 C
Mumbai
Sunday, September 19, 2021
घरराजकारणजुन्याच कंत्राटदाराकडून काम केल्यामुळे नवी 'डोकेदुखी'

जुन्याच कंत्राटदाराकडून काम केल्यामुळे नवी ‘डोकेदुखी’

Related

वांद्रे पश्चिम तसेच कुलाबा विभागात नव्या कंत्राटदाराची नियुक्ती न केल्यामुळे पालिकेच्या खिशावर निष्कारण भार पडला आहे. तौक्ते वादळात या विभागातील बहुतांश झाडे उन्मळून पडली. परंतु कंत्राटदार नियुक्त नसल्यामुळे जुन्याच कंत्राटदाराकडून कामे करवून घ्यावी लागल्याकारणाने पालिकेला अदमासे २३ लाख ३१ हजार रुपये मोजावे लागले.

वादळामुळे सर्वाधिक झाडे कोसळली होती. तौक्तेमध्ये मुंबईतील तब्बल ८५० झाडे कोसळली होती. तर जवळपास १२०० झाडांच्या फांद्या तुटलेल्या होत्या. कुलाबा तसेच वांद्रे पश्चिम या विभागात कंत्राटदार न नेमल्यामुळे ही सर्व कामे जुन्याच कंत्राटदाराकरवी करवून घेण्यात आली.

कुलाब्यातील कंत्राटदाराची मुदत वास्तविक पाहता, जूनमध्येच संपली होती. परंतु तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीत पालिकेने योग्य वेळी कंत्राटदार न नेमल्यामुळे जुन्या कंत्राटदाराकडूनच पालिकेला काम करून घ्यावे लागले. त्यामुळे खर्चामध्ये काही टक्के अधिक वाढ झाली. कुलाबा येथील खर्चात मूळ कंत्राटाच्या किमतीपेक्षा २१ टक्के वाढ झाली. तर वांद्रे पश्चिम मधील खर्चात मूळ कंत्राटाच्या सुमारे दहा टक्के वाढ झाली.

हे ही वाचा:

कल्याण सिंह यांच्या निधनानाने उत्तर प्रदेशात ३ दिवसांचा दुखवटा

पंतप्रधान मोदींचे खास संस्कृत ट्विट! म्हणाले…

“आमच्या सहनशक्तीच्या अंत पाहू नका…” मुफ्तींची मुक्ताफळे

मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या पालघर जिल्हा मुख्यालयासमोरचा रस्ता पाण्याखाली

एकीकडे मुंबईतील अनेक विभागांमध्ये पालिकेने झाडे कापण्यासाठी अनेक गृहनिर्माण सोसायट्यांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम आकारली होती. हे चित्रही सर्वांनीच पाहिलेले होते. तर दुसरीकडे पालिकेने दोन कंत्राटदार न नेमून स्वतःचा खिसा खुला केला आहे. पालिकेकडून वेळीच या कंत्राटदारांची नेमणूक झाली असती, तर जुन्या कंत्राटदारावर काम सोपविण्याची वेळच आली नसती. योग्य वेळेत निविदा न निघाल्याने आणि कंत्राटदारांची नेमणूक न झाल्याने अवास्तव खर्च करण्याची वेळ आलेली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,409अनुयायीअनुकरण करा
3,170सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा