30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरक्राईमनामाअफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटांचे सत्र सुरूच

अफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटांचे सत्र सुरूच

Google News Follow

Related

अफगाणिस्तानच्या अशांत नांगरहार प्रांतातील एका मशिदीत शुक्रवारी झालेल्या बॉम्बस्फोटात किमान तीन ठार आणि १५ जण जखमी झाले, असे तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले.

हा स्फोट – ज्यासाठी अद्याप कोणत्याही गटाने जबाबदारी स्वीकारलेली नाही – अफगाणिस्तानातील नवीन तालिबान राजवटीला तोंड देत असलेल्या अनेक आव्हानांपैकी एक अधोरेखित करते. संयुक्त राष्ट्राने चेतावनी दिली की देश देखील जगातील सर्वात वाईट मानवतावादी संकटाच्या उंबरठ्यावर आहे.

ऑगस्टमध्ये तालिबानने देशाची सत्ता काबीज केल्यापासून इस्लामिक स्टेट गटाच्या कारवायांचे केंद्र असलेल्या पूर्व प्रांतातील स्पिन बोल्डाक जिल्ह्यात शुक्रवारच्या नामाझादरम्यान हे घडले.

“स्पिन बोल्डाक जिल्ह्यातील एका मशिदीत शुक्रवारच्या नमाज दरम्यान झालेल्या स्फोटाची मी पुष्टी करू शकतो. यात जीवितहानी झाली आहे.” तालिबानी अधिकाऱ्याने एएफपी या वृत्तसंस्थेने सांगितले.

वल्ली मोहम्मद, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांनी सांगितले की, इमामच्या रोस्ट्रमजवळील लाऊडस्पीकरमध्ये बॉम्ब लपवून ठेवण्यात आला होता. जेव्हा अजान वाजवण्यासाठी स्पीकर चालू केला तेंव्हा डिव्हाइसचा स्फोट झाला. असं तो म्हणाला.

हे ही वाचा:

…तर ब्रह्मोस क्षेपणास्त्र LACवर कसे नेणार?

सलमान खुर्शीद यांना, हिंदुत्वावर बरळल्यानंतर घरचा आहेर

न्यूझीलंडविरुद्ध भारताची टीम घोषित, कोण आहे नवीन कर्णधार?

खासगी चालकांकडून शिवनेरी बस सेवा सुरू; संपात फूट पाडण्याचा प्रयत्न, आंदोलकांचा आरोप

तालिबानच्या सत्तेत परतल्यापासून इस्लामिक स्टेट गटाची अफगाण शाखा नांगरहार प्रांतात हिंसाचाराची मोहीम राबवत आहे. जरी आयएसआयएस आणि तालिबान हे दोन्ही कट्टर सुन्नी इस्लामी दहशतवादी गट असले तरी ते धर्म आणि रणनीतीच्या मुद्द्यांवर भिन्न आहेत, ज्यामुळे दोघांमध्ये संघर्ष सुरु आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा