30.9 C
Mumbai
Friday, November 27, 2026
घरराजकारणलोकसभा जागांमध्ये ५० टक्के वाढीला कॅबिनेटची मंजुरी

लोकसभा जागांमध्ये ५० टक्के वाढीला कॅबिनेटची मंजुरी

मोदी सरकारची डीलिमिटेशन बिलाची तयारी सुरू

Google News Follow

लोकसभेतील जागांची संख्या ५० टक्क्यांनी वाढवण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी, २७ नोव्हेंबर रोजी मंजुरी दिली. मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकातील सुधारणांचा हा महत्त्वाचा भाग आहे. नव्या प्रस्तावानुसार, सर्व राज्यांमधील लोकसभेच्या जागांमध्ये समान प्रमाणात ५० टक्के वाढ केली जाणार आहे. मात्र, राज्यांमधील जागांचे परस्पर प्रमाण २०५१ पर्यंत कायम ठेवले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयामुळे लोकसभेची सदस्यसंख्या सध्याच्या ५४३ वरून वाढून कमाल ८५० पर्यंत जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. यामध्ये राज्यांसाठी ८१५ आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी ३५ जागांची तरतूद प्रस्तावित आहे. जागावाटपासाठी १९७१ च्या जनगणनेचा आधार कायम ठेवून राज्यांचे परस्पर प्रतिनिधित्वाचे प्रमाण पुढील २५ वर्षांसाठी गोठवण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. यामुळे लोकसभेतील राज्यांचा सध्याचा वाटा कायम राहील. दुसरीकडे, मतदारसंघांच्या अंतर्गत सीमा निश्चित करण्यासाठी २०११ च्या जनगणनेचा आधार घेण्याची तरतूद अपेक्षित आहे.

या प्रस्तावाचा संबंध लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याशी आहे. २०२३ मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षण कायद्याची अंमलबजावणी जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडण्यात आली होती. नव्या सुधारणांद्वारे ही प्रक्रिया पुढे नेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आगामी ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात हे विधेयक पुन्हा मांडले जाण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन ३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

दरम्यान, मतदारसंघ पुनर्रचनेवरून दक्षिणेकडील राज्यांनी यापूर्वी चिंता व्यक्त केली होती. लोकसंख्येच्या आधारावर जागांचे पुनर्वाटप झाल्यास लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या दक्षिणेकडील राज्यांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व तुलनेने कमी होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या राज्यांनी याबाबत आक्षेप नोंदवले होते. प्रत्येक राज्याच्या जागांमध्ये समान प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय या चिंतेला उत्तर देणारा असल्याचे मानले जात आहे.

हे ही वाचा : 

२७ देशांमध्ये ‘रामायण’ सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट

‘रामायण’ चित्रपटावर आक्षेप असेल तर स्वतःचा चित्रपट बनवा!

महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारचे बहुमताचे गणित जुळणार?

मुख्यमंत्री विजय यांचा निवडणूक विजय न्यायालयीन कसोटीवर

यापूर्वी एप्रिलमध्ये सरकारने मांडलेले १३१ वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत आवश्यक दोन तृतीयांश बहुमत मिळवू शकले नव्हते. १७ एप्रिल रोजी झालेल्या मतदानात विधेयकाच्या बाजूने २९८, तर विरोधात २३० मते पडली होती. त्यामुळे सरकारसमोर पुन्हा एकदा घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करून घेण्याचे आव्हान आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली असून, या विधेयकाविरोधात संयुक्त रणनीती आखण्याची तयारी सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा