27 C
Mumbai
Wednesday, June 29, 2022
घरक्राईमनामादिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला

Related

आसामचे मुख्यमंत्री डॉ. हेमंत बिस्वा सरमा यांच्या पत्नी रिंकी भुईया सरमा यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. गुवाहाटी येथील न्यायालयात मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. यावेळी रिंकी यांनी नुकसान भरपाईसाठी शंभर कोटी रुपयांची मागणी केली आहे.

आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया यांनी ४ जून रोजी पत्रकार परिषदेत रिंकी सरमा यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. आसाम सरकारने मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि मुलाच्या कंपनीला २०२० मध्ये कोरोना महामारीच्या काळात बाजारापेक्षा जास्त किमतीत पीपीई किट खरेदी करण्याचे आदेश दिले होते. असा आरोप मनीष सिसोदिया यांनी केला होता. त्यावरून रिंकी सरमा यांनी त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.

हे ही वाचा:

आदित्य ठाकरे ‘मंत्रीपद’ सोडणार?

‘जास्तीत जास्त काय होईल सत्ता जाईल’

राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण

ठाकरे सरकार अडचणीत; ४० पेक्षा जास्त आमदार सोबत असल्याचा शिंदेंचा दावा

रिंकी सरमा यांच्यावर झालेले आरोप मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी फेटाळले आहेत. ते म्हणाले, “जेव्हा संपूर्ण देश सर्वात वाईट महामारीचा सामना करत होता. आसाममध्ये खूप कमी पीपीई किट होत्या. त्यावेळी माझ्या पत्नीने पुढे येण्याचे धाडस दाखवले आणि सरकारला १ हजार ५०० पीपीई किट दान केल्या, त्यावेळी तिने एक पैसाही घेतला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मनीष सिसोदिया यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केल्यांनतर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे हेमंत सरमा यांनी सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,940चाहतेआवड दर्शवा
1,921अनुयायीअनुकरण करा
11,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा