28.3 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरराजकारण'अहमदनगरचे नाव 'अहिल्यादेवी नगर' करा'

‘अहमदनगरचे नाव ‘अहिल्यादेवी नगर’ करा’

Google News Follow

Related

मंगळवार, ३१ मे रोजी अहिल्याबाई होळकर यांची जयंती झाली. त्या दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ‘अहमदनगर’चे नाव बदलून ‘अहिल्यादेवी नगर’ करण्यात यावे अशी मागणी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. त्यामुळे नामांतराचा निर्णय ठाकरे सरकराने लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी पडळकरांनी केली आहे.

अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत चौंडीला जात होते. मात्र तेव्हा त्यांना तिकडे जाण्यापासून पोलिसांनी अडवले होते. त्यावेळी चौंडीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि रोहित पवार यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावरून पडळकरांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. त्यांनतर पडळकरांनी अहमदनगरच नाव बदलून अहिल्यादेवी करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

हे ही वाचा:

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये स्फोट, तीन जवान जखमी

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार; सचिन वाझे माफीचा साक्षीदार

RBI ची ‘सोन’ पावलं !

१० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हजार कोटी

ट्विटमध्ये पडळकर म्हणाले, शेकडो मुंबईच्या लोकांचा बळी घेणारा मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद बहिणीसोबत व्यवहार करणारे नवाब मलिकांचे पालनकर्ते राष्ट्रवादीचे शरद पवार आहेत. त्यांनी मुघलशाही पद्धतीने पोलीस दलाचा वापर केला आहे.अहिल्याबाई भक्तांना दर्शनापासून रोखले आहे. अहिल्याबाई यांची जयंती त्यांना नातवाला लाँच करण्याचा इव्हेंट वाटतो. जेव्हा हिंदुस्तान मुस्लिम राजवटीती हिंदू मंदिर तोडली जात होती तेव्हा अहिल्याबाई यांनी संस्कृतीसाठी प्राण फुंकले, त्यांनी हिंदू संस्कृती वाचवली. अहमदनगरमध्ये अहिल्याबाई यांचा जन्म झाला त्यामुळे अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यादेवी करावे. होळकरशाहीचा सन्मान करा. त्यामुळे तातडीने सरकारने याबाबत निर्णय घ्यावा. काकाच्या रिमोट कंट्रोलवर न चालत स्वाभिमानी मुख्यमंत्री असल्याचे सिद्ध करा, असे पडळकर म्हणाले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा