22 C
Mumbai
Wednesday, January 28, 2026
घरराजकारणचन्नी-सिद्धू वादात आता चन्नी आक्रमक भूमिकेत

चन्नी-सिद्धू वादात आता चन्नी आक्रमक भूमिकेत

Google News Follow

Related

चरणजितसिंग चन्नी आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी आता प्रदेश काँग्रेस अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्रात प्रवेश केला आहे. पक्षाच्या ब्लॉक अध्यक्षांच्या तक्रारी ऐकण्यासाठी आणि २०२२ च्या विधानसभेपूर्वीची रणनीती ठरवण्यासाठी पक्षाच्या ब्लॉक अध्यक्षांची बैठक बोलावली आहे.

चन्नी यांनी माळवा, दोआबा आणि माझा भागातील ब्लॉक अध्यक्षांच्या प्रदेशनिहाय बैठका बोलावल्या होत्या. सोमवारी माळव्यातील ब्लॉक अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर, चन्नी यांनी मंगळवारी दोआबा आणि माझातील नेत्यांची बैठक घेतली. यावेळी सिद्धू लुधियानामध्ये पक्षाचे नगरसेवक आणि उद्योगपतींसोबत बैठक घेत होते.

पंजाबचे प्रभारी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव हरीश चौधरी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकांचा भाग होते. सिद्धू यांची दोन्ही बैठकींना अनुपस्थिती सर्वांच्याच निदर्शनात आली.

सिद्धू यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, त्यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. “त्याला निमंत्रित केले असते तर ते गेले असते.” असे त्याच्या जवळच्या सूत्राने सांगितले. ते पुढे म्हणाले की, काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठका मुख्यमंत्री आणि प्रभारी यांनी घेणे योग्य आहे.

हे ही वाचा:

आसाम, पश्चिम बंगालमधील लोकसंख्येचे बदल ही चिंतेची बाब

सर्व कोरोना रुग्ण समान आहेत, पण काही रुग्ण इतरांपेक्षा अधिक समान आहेत

पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

राज्यात आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ‘हे’ नियम लागू 

ब्लॉक अध्यक्षांनी सिद्धूचा पक्ष सरकारवर हल्लाबोल केल्याचा मुद्दा उपस्थित केल्याचे कळते. एका नेत्याने सांगितले की, “काँग्रेसची प्रतिमा मलिन केल्यामुळे सिद्धू यांना सरकारवर टीका करू नका असे काहींनी सांगितले.

सिद्धू यांनी उघडपणे स्वपक्षाच्या सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. नुकतेच त्यांनी ड्रग्जच्या मुद्द्यावर एसटीएफचा अहवाल सार्वजनिक न केल्यास आमरण उपोषण करण्याची धमकी दिली होती. तिजोरी रिकामी असताना मुख्यमंत्री सवलती देत ​​आहेत, असे म्हणत चन्नी यांनी दिलेल्या आश्वासनांवरही ते टीका करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा