31 C
Mumbai
Sunday, May 26, 2024
घरराजकारणबारामतीमध्ये भाकरी फिरविण्याची वेळ आलीये!

बारामतीमध्ये भाकरी फिरविण्याची वेळ आलीये!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

Google News Follow

Related

बारामतीमध्ये परिवर्तनाची आस आणि घड्याळाची लाट आहे. बारामतीकरांनी परिवर्तन करायचा निर्धार, संकल्प केला आहे. ही लढाई ऐतिहासिक असली तरी ती वैयक्तिक नाही. विकासवाद विरुद्ध परिवारवाद अशी लढाई आहे. आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे. त्यामुळे बारामतीत परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज पुण्यात शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला.त्यापूर्वी झालेल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच सुनेत्रा पवार यांच्याबाबत नात्यावरून वक्तव्य केले होते.शरद पवारांच्या व्यक्तव्यावर देखील मुख्यमंत्री शिंदेही भाष्य केलं आहे.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटते त्यांना मनातल्या मनात मांडे खाऊ द्या. ज्यांच्या मनात मांडे त्यांच्या पदरात धोंडे पडल्याशिवाय राहणार नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता लगावला.अब की बार सुनेत्राताई पवार, अशी घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

हे ही वाचा:

कोठेही लाँच होत नाहीये काँग्रेसचे ‘राहुल यान’

इराणने जप्त केलेल्या इस्रायली जहाजावरील भारतीय डेक कॅडेट सुखरूप परतली मायदेशी

ईव्हीएम, व्हीव्हीपीएटी प्रणालीबद्दलच्या टिपणीवर वेदना झाल्या

केजरीवाल खाणार, त्यांना साखरेचे देणार! रक्तातील साखर वाढविण्यासाठी आटापीटा

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, मी शरद पवार साहेबांचे बोट धरून राजकारण शिकलो. पण शरद पवार यांचे बोट सोडल्यावर मोदीजींनी देशाचा कायापालट केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा शरद पवार यांचे बोट आता सोडले आहे. सुनेत्रा पवार आणि अजित पवार बारामतीचा कायापालट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, देशाला महासत्ता बनवण्याचे वचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. हे वचन पंतप्रधान पूर्ण करतीलच याची गॅरंटी आहे. आता देशामध्ये केवळ मोदी गॅरंटी चालते आणि म्हणून ही देशाची निवडणूक हे देशाचे भवितव्य ठरवणारी आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रधानमंत्री करण्याचा विचार या देशातली जनता स्वप्नात देखील करू शकणार नाही. इस्रोने चांद्रयान लॉन्च केले. परंतु काँग्रेस राहुल गांधी यांना लाँच करू शकली नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला लगावला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
156,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा