35 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरराजकारणचमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादकपदाचा काय संबंध आहे?

चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादकपदाचा काय संबंध आहे?

Google News Follow

Related

शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणींबद्दल केलेल्या वक्तव्याचा भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी निषेध नोंदवला आहे. संजयजी, महिलांची तुलना करताना भान राखा. अन्यथा आम्हालाही आरेला कारे करता येते, असा इशारा भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी दिला आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट करून त्यांनी हा इशारा दिला आहे. संजयजी काल तुम्ही स्मृती ईराणींबद्दल बरळलात. मुळात तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादकपदाचा काय संबंध आहे? ते आधी सांगा. मग मी तुम्हाला स्मृती ईराणी आणि त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा काय संबध आहे याबाबत मी नक्की खुलासा करेन. आपणास एक स्पष्ट सांगायची आहे की, संजय राऊतजी भाषणात महिलांची तुलना करताना भान ठेवा. अन्यथा आम्हा महिलांनाही आमचा सन्मान राखण्यासाठी आरेला कारे करण्याची भाषा वापरता येते, असा इशारा वाघ यांनी दिला आहे.

राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उंची मोठी असल्याचं म्हटलं होतं. त्यावरही चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राणेंच्या कर्तृत्वाची उंची खूप मोठी आहे, असं कधी नव्हे ते तुम्ही खरे बोललात. राणेंच्या कर्तृत्वाची उंची वाढतच राहणार आहे. म्हणूनच तर शिवसेनेला ते झेपलं नाही, असा टोला लगावतानाच असो मी पण अपेक्षा करते की आपल्या बंधूलाही लवकरच मंत्रीपद मिळेल. जेणे करून आपल्यालाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आभार मानण्याचे सौभाग्य प्राप्त होईल, असा चिमटाही त्यांनी काढला आहे.

हे ही वाचा:

कोविडला धोबीपछाड द्यायला मोदी सरकारचा महत्वाचा निर्णय

रझा अकादमीचा जनाबसेनेला दम…मोहम्मद पैगंबर कायदा आणण्यासाठी दबाव

नवे मंत्री अश्विनी वैष्णव पहिल्याच दिवशी ऍक्शन मोडमध्ये

मोदींनी केला २०२४ चा शंखनाद

दरम्यान, पालिकेच्या शाळेतील एका कार्यक्रमात संजय राऊत यांनी शिक्षणाच्या मुद्द्यावरून स्मृती ईराणी यांच्यावर टीका केली होती. शिक्षणाचा कसा खेळखंडोबा आहे बघा. या देशाला नवे शिक्षण मंत्री मिळाले. त्यांचं नाव धर्मेंद्र प्रधान. चांगले आहेत ते. काल पर्यंत ते पेट्रोल विकत होते. पेट्रोलियम मंत्री होते ते. त्यांच्या आधी रमेश पोखरियाल नावाचे शिक्षण मंत्री होते. ते शाळेतच कधी गेले नव्हते. पण ते शिक्षण मंत्री होते. आता त्यांना कळलं की त्यांना काही येत नाही. त्या आधी स्मृती ईराणी. मॉडेलिंग करायची. म्हणजे शिक्षणाचा काहीही संबंध नसलेले लोकं आपलं शिक्षण खातं सांभाळायचे आहे. म्हणून तो चित्रपट आला होता. शिक्षणाचा आयचा घो. बरोबर आहे ते, असं राऊत म्हणाले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा