मुंबईतील कुर्ला परिसरात एका तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक आणि खळबळजनक घटना आज समोर आली आहे. या प्रकरणानंतर मुंबईतील कायदे आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणावरून विरोधी पक्ष नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट करत मुंबईच्या खड्ड्यांसारखीच मुंबईची सुव्यवस्था खड्ड्यात गेली आहे, असा टोला लगावला आहे.
मुंबईमध्ये पुन्हा एकदा दुर्दैवी घटना कुर्ला येथे घडल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही घटना निर्जनस्थळी घडली आहे. साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी एक परिपत्रक काढले होते. त्या परिपत्रकात निर्जनस्थळी सुरक्षेसाठी काय काय करणार असल्याचे मुद्दे लिहिले होते. लाईट व्यवस्था करणार, महापालिकेची मदत घेणार, निर्जनस्थळी क्यूआर कोड लावणार अशा अनेक सूचना या परीपत्रकात केल्या आहेत. आता मुंबईच्या पोलीस कमिशनर यांनी जनतेला एकदा सांगाव की यातील कोणकोणती कामे झालेली आहेत, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
जॅकलिनचा ‘तो’ रोमँटिक फोटो ठरणार का ED साठी पुरावा?
सीआयडीकडून परमबीर यांना दोन समन्स
मुंबई हादरली! कुर्ल्यामध्ये तरुणीची बलात्कारानंतर हत्या
गायीच्या शेणापासून अँटी बॅक्टेरियटल कापडाची निर्मिती
साकीनाका घटनेनंतरही महिला अत्याचारांच्या घटना कमी झालेल्या नाहीत. महिलांसाठी सुरक्षित शहर म्हणून मुंबईची ओळख होती. मात्र, आता मुंबई जंगलराजच्या वाटेवर आहे, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. सरकारला जेवढी काळजी मुंबईच्या नाईट लाईफची आहे, तेवढीच काळजी महिलांच्या सुरक्षेची का नाही?, असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.
मुंबई कुर्ला इथं तरूणीवर बलात्कार करून हत्या झालीये…तिचा मृतदेह अजूनही बेवारस पडून आहे…
मुंबईच्या खड्यासारखीच राज्यातील कायदा सुव्यवस्था पण खड्ड्यात गेलीय..@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @bb_thorat @maharashtra_hmo @MumbaiPolice @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @BJP4Mumbai pic.twitter.com/CELl8PoCRs
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 27, 2021
कुर्ला येथील एचडीआयएल कंपाउंडमध्ये घडली आहे. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. काही तरुण त्यांच्या इन्स्टाग्रामच्या व्हिडिओ शूटसाठी एचडीआयएल कंपाउंडमधील बंद असलेल्या इमारतीवर गेले असता त्यावेळी त्यांना टेरेसवर तरुणीचा मृतदेह दिसला. तरुणांनी तातडीने यासंबंधीची माहिती पोलिसांना दिली.







