26 C
Mumbai
Monday, September 26, 2022
घरराजकारणराज ठाकरेंकडे श्रीगणेशाचे दर्शन घेण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी कुणाला केला चरणस्पर्श

राज ठाकरेंकडे श्रीगणेशाचे दर्शन घेण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी कुणाला केला चरणस्पर्श

Related

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क, दादर येथील शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरे यांच्या नव्या घरात प्रथमच श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गणेशाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री आले होते.

यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. नमस्कार करत राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना सामोरे गेले. तेवढ्याच राज ठाकरे यांच्या मातोश्री तिथे आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाकून त्यांच्या पायांना स्पर्श करत नमस्कार केला. मोठ्यांचा सन्मान राखण्याच्या भारतीय संस्कृतीचे दर्शन मुख्यमंत्र्यांनी घडविले त्याचेही कौतुक केले गेले. नंतर ते राज ठाकरे यांना भेटले आणि त्यांच्याशी हस्तांदोलन केले. मग मुख्यमंत्र्यांनी श्रीगणेशाचे दर्शन घेतले.

हे ही वाचा:

गर्भाशयाच्या कर्करोगावर आता आली लस

पुढच्या वर्षी लवकर या, दीड दिवसांच्या बाप्पाला निराेप

गर्भवतीचा मृत्यू झाला आणि पोर्तुगालच्या आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा दिला

‘बिग बी’ने कोरोनाला दुसऱ्यांदा लगावला ठोसा

 

राज ठाकरे यांच्या भेटीमुळे मीडियात बरीच चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांनीही राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यामुळे भाजपा मनसे युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

याचसंदर्भात पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारणा केल्यावर ही सदिच्छा भेट होती असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती, त्यानंतर त्यांना भेटता आले नव्हते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांची भेट घेतली. त्यामुळे त्याचे वेगळे अर्थ काढण्याची गरज नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज ठाकरे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य गप्पा मारत होते. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे यांच्यासोबतच मनसेचे बाळा नांदगावकर, सरदेसाई हे मुख्यमंत्र्यांसोबत होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,967चाहतेआवड दर्शवा
1,943अनुयायीअनुकरण करा
40,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा