33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरअर्थजगतमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसमध्ये २० उद्योगांशी करणार चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसमध्ये २० उद्योगांशी करणार चर्चा

अनेक गुंतवणूकदार आणि उद्योजकांना भेटणार

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे “वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी” दावोस येथे उद्योग दौऱ्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रवाना झाले असून या परिषदे दरम्यान मुख्यमंत्री जागतिक पातळीवरील विविध उद्योग तसेच आर्थिक समूहांच्या प्रमुखांशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस दौऱ्यावर गेले असून या दौऱ्यामध्ये जवळपास २० उद्योगांसमवेत सुमारे एक लाख ४० हजार कोटींचा करार होणार आहे.सोळा आणि सतरा जानेवारी हे दोन दिवस ते या परिषदेमध्ये उपस्थित राहणार असून त्यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत तसेच वरिष्ठ अधिकारीही असणार आहेत.

ही परिषद २० जानेवारी पर्यंत चालणार असून जागतिक पातळीवरील अनेन बड्या बड्या उद्योगाबाबत चर्चा केली जाणार आहे. आत्ता पर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच महाराष्ट्राचे सामजंस्य करार होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या प्रगतीविषयी जगभरातील अनेक मान्यवर गुंतवणूकदार आणि अनेक मोठ्या उद्योगांच्या प्रमुखांबरोबर संवाद साधणार आहेत.

मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स-२०१८ महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक वाढविण्याचाही सरकारचा जाणीवपूर्वक प्रयत्न असणार आहे. यासोबतच पुढील महिन्यात होणाऱ्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स-२०१८ या राज्याच्या महत्त्वाकांक्षी उद्योग परिषदेच्या आयोजनाच्या पार्श्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण असणार आहे.

हे ही वाचा:

जय जवान, तुम्हाला सलाम!

कुस्तीपटुंना खुशखबर.. मानधनात होणार इतकी वाढ

नितीन गडकरी यांना तुरुंगातून आला होता धमकीचा फोन

उर्फी प्रकरणात तृप्ती देसाईंना वाटू लागला रस; उर्फीला हात लावूनच दाखवा!

या परिषदेत जगातील शंभरहून अधिक देशातील जवळपास अडीच हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यातून महाराष्ट्राच्या वाट्याला नेमकं काय येणार आहे आणि राज्यात किती रोजगार उपलब्ध होतो याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोळा जानेवारी रोजी दुपारी एक वाजता महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन करणार असून सुसज्ज आणि आकर्षक पॅव्हेलियन दावोस येथे प्रमुख ठिकाणी आणि भारताच्या पॅव्हेलिनसमोरच ते असणार आहेत. त्यानंतर काही महत्वाच्या उद्योगांसमवेत सामजंस्य करार केले जाणार आहेत.

जागतिक आर्थिक परिषदेच्या “न्यू इकॉनॉमी एंड सोसायटी या केंद्राचे” तसेच अर्बन ट्रान्सफॉरमेशनचे प्रमुख देखील मुख्यमंत्र्यांना भेटतील. सायंकाळी सव्वासात वाजता मुख्यमंत्री हे मुख्य स्वागत समारंभासाठी काँग्रेस सेंटर येथे दाखल होतील. राऊत यांची टीका मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. तुमच्या नाकासमोर राज्यातील प्रकल्प पळवले. गुजरातने हे प्रकल्प पळवले. त्यामुळे राज्याचं मोठं नुकसान झालं आहे गुंतवणूक गेली आणि रोजगारही गेले आहेत. त्यामुळे दावोसला जाण्याआधी गुजरातला जा,असा टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा