34 C
Mumbai
Wednesday, October 7, 2026
घरराजकारणअमित शहांचे भाषण ऐकले असते तर विरोधकांची थोबाडे काळी झाली असती!

अमित शहांचे भाषण ऐकले असते तर विरोधकांची थोबाडे काळी झाली असती!

देवेंद्र फडणवीसांनी घेतला खरपूस समाचार

Google News Follow

Related

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचं पूर्ण भाषण ऐकलं असतं तर विरोधकांनी टीका केली नसती. महाराष्ट्रात मराठीच कशी योग्य आहे हे अमित शाहांनी सांगितलं, मातृभाषेचं महत्त्वही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील लोक बहुभाषिक आहेत याचा अर्थ असा नाही की माझी मातृभाषा बदलेल. सिलेक्टिव्ह ऐकायचं आणि त्यावर टीका करायची हे योग्य नाही. अमित शाह काय बोलले ते पूर्ण ऐकलं असतं तर यांची थोबाडं काळी झाली असती, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

नवी मुंबईतल्या राजभाषा संमेलनात अमित शाहांनी हिंदी विरोधकांवर हल्लाबोल केला होता. त्यामध्ये महाराष्ट्र ही सगळ्यात मोठी बहुभाषी भूमी असल्याचं अमित शाहांनी म्हटले होते. मातृभाषेसोबत दुसरी राष्ट्रीय भाषा शिकायला विरोध करणारे पाप करत आहेत, असंही अमित शाह म्हणाले. त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी अमित शाह यांच्या वक्तव्यावर टीका केली होती. तसेच राज ठाकरे यांनीही कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, असे एका वाक्यात पोस्ट करत अप्रत्यक्षपणे अमित शाह यांच्यावर टीका केली असल्याचीही चर्चा आहे.

हे ही वाचा:

कच्च्या तेलाच्या दरवाढीचा सोन्याला फटका

₹२ हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर शुल्काची शक्यता

गुरुग्राममध्ये महिला बाईकस्वाराला धडक देणाऱ्या कल्याण बैंसलाला अटक

अफगाणिस्तानात केरळच्या महिला व्लॉगरला अटकेची धमकी

विरोधकांच्या या भूमिकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले. फडणवीसांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मुंबईत परवानगी नाकारली आहे. या प्रकरणी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे काम आहे. ⁠पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ⁠पुन्हा अर्ज केला आहे मेरीटवर निर्णय घेतला जाईल. मुंबई-पुण्यात गणेशोत्सव हा मोठा सण असतो. या काळात कायदा सुव्यवस्था महत्त्वाची आहे. मनोज जरांगे यांच्या अनेक मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत. काही प्रश्न कोर्टात आहेत.

दिशा सालियन प्रकरणात सीबीआयने नव्याने एफआयआर दाखल केली आहे. त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांचेही नाव आहे. यावर प्रतिक्रिया विचारली असता मुख्यमंत्री म्हणाले की, दिशा सालिअन केससंदर्भात मी एफआयआर पाहिली नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयनं एफआयआर केली. त्यावर आपण तर्कवितर्क करणं योग्य नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा