34 C
Mumbai
Wednesday, October 7, 2026
घरविशेषदुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानांना २४ तासांहून अधिक विलंब

दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानांना २४ तासांहून अधिक विलंब

संतप्त प्रवाशांचा विमानतळावर ठिय्या

Google News Follow

Related

दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या दोन विमानांना २४ तासांहून अधिक विलंब झाल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला. विमानाच्या उड्डाणाची वेळ वारंवार बदलूनही स्पष्ट माहिती मिळत नसल्याने संतप्त प्रवाशांनी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरच ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, प्रवाशांनी विमान कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एसजी ५१११ आणि एसजी ५१०५ या दोन विमानांच्या विलंबामुळे शंभरहून अधिक प्रवासी विमानतळावर अडकून पडल्याचे समोर आले आहे.

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, अनेक तास विमानतळावर प्रतीक्षा करूनही उड्डाणाबाबत ठोस माहिती दिली जात नव्हती. त्यामुळे अन्न, पाणी आणि विश्रांतीची गैरसोय होत असल्याने प्रवाशांचा संयम सुटला. काही प्रवाशांनी टर्मिनलमध्येच बसून आंदोलन सुरू केले. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर विमानतळ प्रशासनाने हस्तक्षेप करत प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये प्रवासी विमान कंपनीच्या व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.
हे ही वाचा:
सेन्सेक्स ७७८ अंकांनी कोसळला

ओयो रूम बुकिंगवर पोलिसांची करडी नजर

पाकिस्तानने दुर्लक्ष केल्यावर हुथीविरोधात सौदी इस्रायलच्या दारी

इराणच्या दक्षिण किनाऱ्याजवळ दोन मच्छिमारी नौकांवर ड्रोन हल्ला

दरम्यान, स्पाइसजेटने विमानांच्या विलंबामागे ऑपरेशनल अडचणी असल्याचे स्पष्ट केले आहे. एका विमानाला सेवेतून दूर ठेवावे लागल्याने निर्माण झालेल्या अडचणींचा परिणाम संबंधित उड्डाणांवर झाला. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीने दिलगिरी व्यक्त केली असून, अडकलेल्या प्रवाशांना दुबईला पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. मात्र, तब्बल २४ तासांहून अधिक काळ विमानतळावर अडकून पडलेल्या प्रवाशांच्या संतापामुळे विमान कंपन्यांकडून विलंबाच्या काळात प्रवाशांना वेळेवर माहिती आणि आवश्यक सुविधा देण्याच्या व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा