महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केलेली टीका मुख्यमंत्री यांना चांगलीच झोंबली आहे. फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर द्यायचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला. पण ती उत्तरं कमी आणि टोलवाटोलवीच जास्त होती. यावेळी आपण फडणवीसांच्या सगळ्याच टीकेला उत्तर द्यायला बांधील नाही असं ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर कोविड काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. यावर मुख्यमंत्री ठाकरेंकडे काहीच उत्तर नव्हते. अखेर त्यांनी कोविड योध्यांच्या कामगिरी मागे आपले अपयश झाकायचा प्रयत्न केला. धारावी पॅटर्नचा दाखला देत याचे कौतुक साऱ्या जगात होत आहे असे ठाकरे म्हणाले. पण भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सरकारची लाज राखण्यासाठी त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हते.
हे ही वाचा:
सावरकर पुण्यतिथीच्या दिवशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सावरकरांना अभिवादन केले नव्हते. पण यावरही त्यांनी फडणवीसांनाच बोल लावले. ज्यांना सावरकरांची जयंती आणि पुण्यतिथी यातला फरक माहीत नाही त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नयेत असे उडवाउडवीचे उत्तर मुख्यमंत्री देताना दिसले.
याच पत्रकार परिषदेत त्यांनी संजय राठोड याच्या जामिन्यावरही भाष्य केले. त्यावेळीही “गुन्हा दाखल करणे म्हणजे न्याय करणे असे होत नाही” असे धक्कादायक विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.







