29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरराजकारणनवरात्रीच्या निर्णयावरून महाविकास आघाडीत 'गरबा'

नवरात्रीच्या निर्णयावरून महाविकास आघाडीत ‘गरबा’

Google News Follow

Related

ठाकरे सरकारमधील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, गरब्यावर बंदी नाही, गृह विभागाने मात्र निर्बंध लावले आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि त्यांचा कारभार हा चर्चेचा विषय आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसांपूर्वी जालन्यात म्हटले होते की, मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व भागात गरबा आयोजित करण्यास बंदी असणार नाही. पण राज्याच्या गृह विभागाने सोमवारी जारी केलेल्या परिपत्रकात संपूर्ण राज्यात गरबा दांडियावर बंदी घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्य सरकारने नुकतीच नवरात्रीसंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे आता जाहीर केली आहेत. यामध्ये देवीची मूर्ती चार फुटांपेक्षा जास्त उंच नको. तसेच देवीची दोन फूट उंच घरगुती मूर्ती सार्वजनिक हॉलमध्ये ठेवण्यास परवानगी असेल. दुर्गादेवी दर्शनाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाइट आणि फेसबुकच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी लागेल.

मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोरोना नियमांचे पालन करणे सक्तीचे असणार आहे. तसेच नवरात्रीला गरबा, दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी असेल. त्याऐवजी आरोग्याशी संबंधित रक्तदान शिबिरांचे उपक्रम आयोजित करावे लागतील.

हे ही वाचा:

माणसं जीवानिशी जात होती, पण लाचखोरी सुरू होती मुबलक

आर्यन खानचे व्हॉट्सअप चॅट आले समोर

गीतकार जावेद अख्तरविरुद्ध गुन्हा दाखल

‘हा’ अवलिया बेटावर तब्बल ३२ वर्षे एकटाच राहत होता… वाचा सविस्तर

 

लोकांना कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी रोग आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता करण्यास सांगितले गेले आहे. टोपे यांचा दावा चुकीचा सिद्ध झाला गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दावा केला होता की, मुंबई महानगरपालिका क्षेत्र वगळता इतर भागात गरबा करण्यास परवानगी आहे. मात्र सरकारने परिपत्रकात स्पष्टपणे नमूद केले आहे की, राज्यभरात गरबा आणि दांडिया आयोजित करण्यावर बंदी असेल. नवरात्री दरम्यान सार्वजनिक मंडळांमध्ये आरती, भजन, कीर्तन आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करताना गर्दी जमा करणे आवश्यक आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा