31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
घरराजकारणसोलापुरात ठाकरेंना दणका देत काँग्रेसची पलटी; ऐन मतदानाच्या दिवशी अपक्ष उमेदवाराला पाठींबा

सोलापुरात ठाकरेंना दणका देत काँग्रेसची पलटी; ऐन मतदानाच्या दिवशी अपक्ष उमेदवाराला पाठींबा

सोलापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी

Google News Follow

Related

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत असताना दुसरीकडे सोलापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली असून राजकीय गणित बिघडले आहे. ऐन मतदानाच्या दिवशी सोलापूरमध्ये काँग्रेसने डाव उलटवला असून काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीतून ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील देखील येथून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, काँग्रेसने मारलेल्या पलटीमुळे येथील राजकीय समीकरण बदलली आहेत. यामुळे संतप्त झालेल्या ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

दक्षिण सोलापूरमध्ये ऐन मतदानाच्या दिवशीचं महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोलापुरात काँग्रेस पक्ष हा अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या पाठीशी आहे. महाविकास आघाडीतून ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, ऐनवेळी काँग्रेसने त्यांचा पाठिंबा अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना जाहीर केला. यानंतर आता ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार रिंगणात असताना काँग्रेसने अपक्ष उमेदवाराला पाठींबा दिल्याने आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींची प्रणिती शिंदेंवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, “प्रणिती शिंदे या भाजपच्या बी टीम आहे. भाजपचा प्रचार करतात आणि त्यांची भाजपसोबत आतून हातमिळवणी आहे. शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी आहे. यापुढे तुम्हाला खासदारकी मिळणार नाही. शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला आहे,” असं म्हणत शरद कोळी यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

हे ही वाचा..

चेन्नईत बीएमडब्ल्यूच्या धडकेत पत्रकाराचा मृत्यू

मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही खूप प्रसिद्ध आहात!

डोमिनिकानंतर गयाना आणि बार्बाडोसकडून पंतप्रधान मोदींना सर्वोच्च सन्मान जाहीर!

बिटकॉइन्समध्ये व्यवहार केला आहे का? भाजपाचा सुप्रिया सुळे, नाना पटोलेंना सवाल

दरम्यान, सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, “गेल्या अनेक वर्षांपासून या मतदान केंद्रावर मतदान करतो आहे. आता या मतदारसंघात धर्मराज काडादी उमेदवार आहेत. काडादी एक चांगले उमेदवार आहेत, त्यांना भविष्य आहे. या मतदारसंघात माने यांना उमेदवारी मिळाली होती पण त्यांना फॉर्म मिळालेला नाही त्यामुळे माने यांनीही काडादी यांना पाठिंबा दिला आहे. या मतदारसंघात शिवसेनेने जास्त गडबड केली. आम्ही या ठिकाणावरुन दोनवेळा निवडून आलो होतो. आम्ही आता त्यांना हे सगळं समजून सांगितले आहे. यामुळे आता काँग्रेसचा अधिकृत पाठिंबा धर्मराज काडादी यांना आहे.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
207,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा