35 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
घरराजकारणभाजपाची सत्ता येताच भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकणार

भाजपाची सत्ता येताच भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकणार

Google News Follow

Related

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणाच्या गोसाबा येथे जाहीर सभा घेऊन थेट ममता बॅनर्जी सरकारला आव्हान दिले आहे. पश्चिम बंगालला भ्रष्टाचाराने पोखरले आहे, आमची सत्ता आल्यावर आम्ही बंगालधून भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करू, असं सांगतानाच सत्ता येताच एसआयटी स्थापन करून भ्रष्टाचाऱ्यांना थेट तुरुंगात पाठवू, असा इशारा अमित शहा यांनी दिला आहे.

सभेला संबोधित करताना अमित शहा यांनी ममता बॅनर्जी सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडलं. राज्यातून टीएमसी सरकार हटवायचं आहे. आजही बंग भूमी भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. आमचं सरकार येताच एसआयटी स्थापन करून भ्रष्टाचारी लोकांना तुरुंगात पाठवलं जाईल, असं ते म्हणाले. तसेच सरकार आल्यानंतर सुंदरवन जिल्ह्याची निर्मिती केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. गंगासागर मेळ्यावर लाखो रुपये खर्च करून हा मेळा आंतरराष्ट्रीय दर्जाचा केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. भाजपा सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत राज्यात आयुष्मान भारत योजना लागू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारवर गांधी नाराज?

गृहमंत्र्यांची सीबीआय चौकशी अटळ?

फोन टॅपिंगमुळे उघड झाला पोलिसांच्या बदल्यांचा धंदा

अनिल देशमुखांची लवकरच गृहमंत्री पदावरून हकालपट्टी?

बंगालमध्ये वादळ आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यासाठी १० हजार कोटी रुपये पाठवले होते. मात्र, हे पैसे लोकांपर्यंत पोहोचलेच नाहीत. पुतण्या आणि कंपनीने हा पैसा खाल्ला. मोदींनी पाठवलेल्या पैशावर डल्ला मारण्यात आला आहे. आम्ही एसआयटी स्थापन करून हा पैसा वसूल केल्याशिवाय राहणार नाही. तसेच या निधीवर डल्ला मारणाऱ्यांना तुरुंगात पाठवल्याशिवायही राहणार नाही. वादळग्रस्तांसाठी आम्ही ६५००० कोटींचे पॅकेज तयार करू. सुंदरवनमध्ये टुरिस्ट सर्किट तयार करण्यात येईल, असंही ते म्हणाले. दीदींनी त्यांच्या जाहीरनाम्यातून २६२ आश्वासने दिली होती. परंतु ते पूर्ण केले नाहीत. त्याचा हिशोब त्यांना द्यावा लागेल. त्या हिशोब देणार नाहीत. त्यामुळे तुम्ही भाजपला निवडून देऊन हिशोब द्या, असं आवाहन त्यांनी केलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा