29.1 C
Mumbai
Monday, October 26, 2026
घरराजकारणपरिस्थितीवर नजर ठेवा, योग्यवेळी योग्य गोष्टी कळतील

परिस्थितीवर नजर ठेवा, योग्यवेळी योग्य गोष्टी कळतील

देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान

Google News Follow

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध होणार नाही असे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले होते . त्या संदर्भात प्रसार माध्यमांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना विचारले. त्यावर बोलतांना फडणवीस यांनी बघत राहा. परिस्थितीवर नजर ठेवा. योग्यवेळी योग्य गोष्टी कळतील असे शांत उत्तर दिले आहे. फडणवीस यांच्या विधानाचा रोख कोणाकडे आहे यावर आता तर्क वितर्क करण्यात येत आहेत.

काँग्रेस नेते डॉ. सुधीर तांबे यांच्याकडे एबी फॉर्म असतानाही ऐनवेळी त्यांनी निवडणुकीतून अंग काढून घेत अर्ज भरला नाही. मात्र, त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने खळबळ उडाली.आपल्या मुलाचा विजयाचा मार्ग सोपा व्हावा म्हणून सुधीर तांबे यांनी अर्ज भरला नाही अशी चर्चा रंगली आहे. तांबे यांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याची कुजबुजही सुरु आहे.

सुधीर तांबे यांच्या अपक्ष उमेदवारी अर्जानंतर काँग्रेसला धक्का बसला आहे. नाशिकमध्ये काहीतरी वेगळं शिजतंय याची बातमी आपल्याला आधीच मिळाली होती. त्याबाबत मी थोरातांना अलर्ट केलं होतं. पण माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. वेगळा पर्याय होईल हे कानावर आलं होतं. त्याचवेळी मी थोरातांना अलर्ट केलं होतं. आमच्या पक्षाची जबाबदारी आहे. आम्ही व्यवस्थित पार पाडू, असंही थोरात म्हणाले असे विधान अजित पवार यांनी केले. दुसरीकडे संजय राऊत यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध होणार नाही असे म्हटले होते. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी योग्यवेळी योग्य गोष्टी कळतील, असं सूचक विधान केलं आहे.

हे ही वाचा:

गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास

कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

एलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

 

शुभांगी पाटील यांना भाजप कडून एबी फॉर्म मिळण्याची अपेक्षा होती. पण ती पूर्ण झाली नाही. त्यामुळे शुभांगी पाटील यांनी मातोश्रीकडे धाव घेतली. शनिवारी मातोश्रीवर झालेल्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर त्यांनी अखेर अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. सत्यजित तांबे यांच्या विरोधात शुभांगी पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून शुभांगी पाटील नाशिकमध्ये शिक्षक पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवणार आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा