29 C
Mumbai
Monday, October 2, 2023
घरक्राईमनामाआता या राजकीय नेत्याच्या पुतण्याचा अपघाती मृत्यू

आता या राजकीय नेत्याच्या पुतण्याचा अपघाती मृत्यू

महाराष्ट्रात राजकीय अपघातांचे सत्र

Google News Follow

Related

नवीन वर्ष सुरु झाल्यापासून राजकीय नेत्यांच्या अपघातांमागील शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. गेल्या काही दिवसात राज्यात राजकीय नेत्यांच्या अपघातांच्या घटनेत वाढ झाली आहे. अगदी काही दिवसांपूर्वी बच्चू कडू, योगेश कदम, जयकुमार गोरे, धनंजय मुंडे यांचे अपघात घडून गेले आहेत. आता आणखी एका भाजप नेत्याच्या पुतण्याचा अपघाती मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. हा अपघात मराठवाड्यातील गेवराई येथे झाला आहे.

भाजप नेते मोहन जगताप यांचे पुतणे विश्वजीत जीवन जगताप यांचा शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास गेवराई बायपास रस्त्याजवळ अपघात झाला. यामध्ये विश्वजीत जगताप यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूने जगताप कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

माजलगाव येथील छत्रपती नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन जीवनराव जगताप यांचे चिरंजीव विश्वजीत जगताप आणि त्याचा मित्र हे काही कामानिमित्त औरंगाबादला गेले होते. सर्व काम आटपून परतताना गेवराईजवळ शुक्रवारी रात्री बाराच्या दरम्यान विश्वजीत यांचा त्यांच्या चारचाकी वाहनावरील ताबा सुटला.आणि त्यांच्या गाडीची टेम्पोला जोरदार धडक झाली. यात विश्वजित यांच्या डोक्याला खूप मार लागला  आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हे ही वाचा:

गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास

कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

एलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

 

या अपघातामध्ये विश्वजीत जगताप यांचा मित्र आर्यन कंटुलेचा जीव वाचला असून त्याने सीट बेल्ट लावल्याने तो या अपघातात वाचला आहे. विश्वजीत जगताप यांच्या पश्चात त्यांचे आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. या अपघातामुळे बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अजित पवार यांचा सल्ला

मागील वर्षी विनायक मेटे यांचे रस्ते अपघातांत निधन झाले होते. रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांनी आपल्या अपघातामागे घातपाताची शक्यता व्यक्त केली होती.  विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रात्रीचा प्रवास टाळण्याचा सल्ला सगळ्यांना दिला आहे तरी महाराष्ट्रात हे राजकीय अपघातांचे सत्र केव्हा थांबणार हा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होत आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
102,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा