34 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरराजकारणमुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना समन्स

मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना समन्स

१६ जानेवारीला हजर राहण्याचे आदेश

Google News Follow

Related

अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी ने मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना समन्स बजावल्याच्या बातमीवर मुंबई महापालिकेचे प्रशासक आणि महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी प्रतिक्रया दिली आहे. अशा प्रकारचे कोणतेही समन्स मला मिळाल्याची कल्पना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना समन्स बजावल्याची जोरदार चर्चा होती. परंतु चहल यांनी समन्सबाबत प्रतिक्रिया देत या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.

चहल यांनी सक्तवसुली संचालनालयाने ईडी समन्स बजावला असून सोमवार दिनांक १६ जानेवारी रोजी त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे असे देखील बोलले जात आहे. मुंबई महापालिकेच्या कोविड काळातील कामांना वगळून इतर कामांची चौकशी करा, असे आदेश नुकतेच राज्य सरकारने कॕगला दिले होते.

रस्ते तसेच इतर कामांची चौकशी करण्यासाठीचे आदेश राज्य सरकारने दिले मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी एपिडेमिक एक्टनुसारच सर्व कामे केल्याचा दावा करत आहेत. त्याबाबतीत तपशील देण्याच्या मुद्द्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. तसेच यंत्रणेतील अधिकार्‍यांना कॕगच्या अधिकारी वर्गाला कोविड काळातील कामांची माहिती देण्यासाठी मज्जावाही केला होता. त्यामुळे कॕगच्या अधिकारी वर्गानेही या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली होती. परंतु राज्य सरकारने कोरोना काळातील कामे वगळून चौकशीचे आदेश देण्याची भूमिका काही दिवसांपूर्वी घेतली होती.होते. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच ईडीच्या समन्सच्या मुद्द्याने डोक वर काढले.

हे ही वाचा:

गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास

कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

एलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

 

गुन्हा कोणा कोणावर दाखल

आझाद मैदान पोलिसांनी लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सव्‍‌र्हिसेस या कंपनीला तिचे भागीदार डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, सुजित मुकुंद पाटकर, संजय मदनलाल शहा आणि राजू नंदकुमार साळुंखे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्यावर फसवणूक, विश्वासघात असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी सुजित पाटकर हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विश्वासू असल्याचा आरोप सोमय्या यांनी थेट केला आहे.

काय आहेत प्रकरणे

करोनाकाळात मुंबई महानगरपालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्यामार्फत आवश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी तब्बल तीन हजार ५३८ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्याचबरोबर करोनाकाळात विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ९०४ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. याशिवाय अजमेरा विकासकाकडून महानगरपालिकेने ३३९ कोटी रुपयांमध्ये भूखंड विकत घेतला आहे आणि .चार पुलांच्या बांधकामांसाठी एक हजार ४९६ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या प्रकरणांची कॅगमार्फत चौकशी करण्यात येणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा