31 C
Mumbai
Sunday, May 26, 2024
घरराजकारण“विरोधकांकडे सर्वच इंजिन; डब्बे लावायला कोणी तयार नाही”

“विरोधकांकडे सर्वच इंजिन; डब्बे लावायला कोणी तयार नाही”

सांगलीतून देवेंद्र फडणवीसांचा ‘इंडी’ आघाडीवर प्रहार

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचे दोन टप्पे यशस्वी पार पडले असून याचं पार्श्वभूमीवर सध्या राज्यासह देशभरात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान, शनिवार, १७ एप्रिल रोजी सांगली लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचाराची सभा पार पडली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेत संबोधित करताना शरद पवार, उद्धव ठाकरे आणि विरोधक यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

राहुल गांधींकडे २६ पक्षांची खिचडी

देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, “सांगलीमध्ये संजयकाका पाटील यांच्यासह अजून काही उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवारांची ही निवडणूक नाही. या निवडणुकीत दोनच पर्याय आहेत. एक पर्याय म्हणजे नरेंद्र मोदी आणि दुसरा पर्याय राहुल गांधी आहेत. एकीकडे महायुती तर दुसरीकडे राहुल गांधींकडे २६ पक्षांची खिचडी आहे. ही लढाई दोन व्यक्तीमत्त्वांमधील आहे. नरेंद्र मोदी यांच्यासारखे मजबूत इंजिन इथे आहे. त्या इंजिनबरोबर वेगवेगळ्या पक्षांचे डब्बे लावलेले आहेत. ही विकासाची ट्रेन आहे. या विकासाच्या ट्रेनमध्ये गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर आहेत. महायुतीची ही गाडी सबका साथ सबका विकास म्हणत पुढे चालली आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विरोधकांकडे सर्वच इंजिन; डब्बे लावायला कोणी तयार नाही

“विरोधकांकडे काय अवस्था आहे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन, तर शरद पवार म्हणतात मी इंजिन, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन. त्यांच्याकडे कोणीही डब्बे लावायला तयार नाही. सोनिया गांधी यांच्या इंजिनमध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनाच जागा आहे. शरद पवार यांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळे बसू शकतात. उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरे यांनाच जागा आहे. त्यांच्या इंजिनमध्ये जनतेसाठी जागा नाही. काँग्रेसच्या सरकारने अनेकवर्ष राज्य केले. आघाडीच्या अनेक मंत्र्यांनी मंत्रिपदे भोगले. पण जनतेला फक्त चॉकलेट दिले,” अशी तिखट शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी ‘इंडी’ आघाडीवर टीका केली.

साखर कारखान्यांसाठी पंतप्रधान मोदींनी अनेक निर्णय घेतले

“ज्यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले होते, त्यावेळी महाराष्ट्रातील एका नेत्यांनी म्हटलं होतं की, नरेंद्र मोदी यांना ऊसाच्या शेतीतले काय कळतं? नरेंद्र मोदी यांना साखर कारखान्याबाबत काय कळतं? मात्र, आज दहा वर्षांनंतर दाव्याने सांगतो, ६० वर्षांचा त्यांचा इतिहास काढा आणि १० वर्षांचा मोदींचा कार्यकाळ काढा. साखर कारखान्यांसाठी आणि ऊसाच्या शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदी यांनी जेवढे निर्णय घेतले, तेवढे आजपर्यंतच्या इतिहासात कधीही झाले नव्हते,” असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे. “मी मुख्यमंत्री झाल्यावर फक्त विदर्भला जास्त पैसा जाईल असा आरोप करण्यात आला, पण मी मुख्यमंत्री असताना पश्चिम महाराष्ट्रामधील अनेक योजनांना सर्वाधिक निधी देत योजना पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न केला. दुष्काळी सिंचन योजनेला नरेंद्र मोदी यांनी निधी दिल्याने आज दुष्काळी भागात पाणी आले आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबईत बॉम्बस्फोट झाल्यावर काँग्रेसने काय केले?

“कोविड काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे लस मिळाली आणि आपण जिवंत राहू शकलो. १०० देश सांगतात की, नरेंद्र मोदींनी दिलेल्या लसीमुळे आमचा देश जिवंत आहे. मुंबईत बॉम्बस्फोट झाल्यावर काँग्रेसने काय केले, पण दहशतवादी हल्ले झाल्यानंतर मोदींनी सर्जिकल स्ट्राईक करत दशहतवाद मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. आता दहशतवादी हल्ले बंद झाले आहेत. चीन देखील आता भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही,” असं देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

हे ही वाचा:

सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडण्यापूर्वी आरोपींकडून बिहारमध्ये सराव

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ९९ हजार १५० मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी

भारत आत्मनिर्भर; चीनमधून खेळण्यांची आयात ७० टक्क्यांनी घटली

नैनीतालमध्ये वणवे पेटून जंगलांचे नुकसान; आयटीआय भवन जळालं

नरेंद्र मोदींनी देश आर्थिकदृष्ट्या मजबूत केला

देवेंद्र फडणवीस असंही म्हणाले की, “देशाच्या लोकसभेची ही निवडणूक असून देशाचा विचार कोण करेल, कोण देश पुढे नेऊ शकेल याची निवडणूक आहे. नरेंद्र मोदींनी देश आर्थिकदृष्ट्या मजबूत केला. व्यवस्थेमधील भ्रष्टाचार कमी केला. २०१३ मध्ये वर्षाला एक लाख कोटी इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च होत होते. मोदी यांच्या काळात १३ लाख कोटी इन्फ्रास्ट्रक्चरवर केले जात आहेत,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभेत भाषणावेळी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
156,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा