28 C
Mumbai
Monday, June 27, 2022
घरराजकारण'काँग्रेसने बाऊ करण्याऐवजी ईडीच्या कारवाईला समोर जावं'

‘काँग्रेसने बाऊ करण्याऐवजी ईडीच्या कारवाईला समोर जावं’

Related

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडे चौकशीसाठी गेले आहेत. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या परवानगीशिवाय अनेक ठिकाणी राहुल गांधींच्या समर्थनार्थ आंदोलन करत आहेत. पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींची ही चौकशी न्यायालयाच्या निर्णयानंतर झालीय, असं फडणवीस म्हणाले आहेत.

नॅशनल हेराल्ड प्रकरण सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले, काँग्रेसने देशातल्या जनतेला वेठीस धरलं आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले. त्यांनंतरच ईडीने कारवाई केली आहे आणि मग चौकशी सुरु केली आहे. चुकीचं काही घडलं तर स्वाभाविकपणे कारवाई ही होणारच आहे. गांधी घरासाठी आणि सर्वांसाठी न्याय, नियम सारखेच आहेत. त्यामुळे देशातील विविध ठिकाणी आंदोलने होत आहेत ती चुकीची आहेत असं फडणवीस म्हणाले आहेत. काँग्रेसने या प्रकरणाचा बाऊ करण्याऐवजी ईडीच्या कारवाईला समोर जावं, असा सल्लाही फडणवीसांनी दिला आहे.

हे ही वाचा:

सदाभाऊ खोतांची विधानपरिषदेच्या निवडणुकीतून माघार

… आणि जवानांनी पर्यटकांची केली सुटका

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी पुण्यात स्फोट; एकाला घेतलं ताब्यात

मूसेवाला हत्येप्रकरणी संतोष जाधवच्या आवळल्या मुसक्या

दरम्यान, राहुल गांधी यांच्या समर्थकांनी काही पोस्टरबाजी केली होती. ज्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख केला होता. यावर फडणवीसांनी राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केल्याचे म्हणत माफी मागायला सांगितली आहे. ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर हे ११ वर्ष अंदमानमध्ये होते. त्यांच्याशी राहुल गांधी यांची तुलना होऊच शकत नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची माफी मागावी.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,937चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
11,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा