26.8 C
Mumbai
Wednesday, July 22, 2026
घरराजकारणधर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने बंद केले इन्स्टाग्राम अकाउंट

धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने बंद केले इन्स्टाग्राम अकाउंट

सोशल मीडियावरील ट्रोलिंगनंतर निर्णय

Google News Follow

Related

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कन्या नैमिषा प्रधान यांनी सोशल मीडियावरील वाढत्या ट्रोलिंगनंतर आपले इन्स्टाग्राम अकाउंट निष्क्रिय (Disable) केले आहे. शिक्षण व्यवस्थेवरील वाद आणि सीजेपी (Cockroach Janata Party) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर त्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

नैमिषा प्रधान यांनी अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स राज्यातील टफ्ट्स विद्यापीठातून (Tufts University) एलएलएम (LLM) पदवी पूर्ण केली आहे. त्यांच्या परदेशातील शिक्षणाचा मुद्दा पुढे करत अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांच्यावर टीका केली. काहींनी भारतातील शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत त्यांच्या वडिलांनी शिक्षणमंत्री असताना मुलीला परदेशात शिक्षणासाठी पाठविल्याबद्दल आक्षेप नोंदवले.
हे ही वाचा:
शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स ८०० अंकांनी कोसळला

इराणची लष्करी ताकद खिळखिळी करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न

हॉर्मुझच्या तणावाने पेटले तेलबाजार; ब्रेंट ९२ डॉलरच्या पार

तिसऱ्या दिवशीही संसद कामकाजाविना ठप्प

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या सीजेपी आंदोलनादरम्यान आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना नैमिषा प्रधान यांच्या सोशल मीडिया खात्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आणि टीकेचा भडिमार झाला. काही वापरकर्त्यांनी त्यांच्या विद्यापीठालाही टॅग करून घोषणाबाजी केली, तर काहींनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.

मात्र या घडामोडींनंतर सोशल मीडियावर अनेकांनी वेगळी भूमिका घेत कुटुंबीयांना राजकीय वादात ओढणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. लोकप्रतिनिधींच्या निर्णयांवर टीका होऊ शकते, मात्र त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना लक्ष्य करणे ही मर्यादा ओलांडणारी बाब असल्याचे अनेकांनी नमूद केले.

दरम्यान, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आंदोलनावर प्रतिक्रिया देताना सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले. विरोधक विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांचे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दुसरीकडे, सीजेपी आंदोलनामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही मोठा राजकीय संघर्ष निर्माण झाला असून शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांची मागणी अधिक तीव्र झाली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
321,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा