26 C
Mumbai
Thursday, December 9, 2021
घरक्राईमनामानवाब मलिकांविरोधात ज्ञानदेव वानखेडे गेले उच्च न्यायालयात

नवाब मलिकांविरोधात ज्ञानदेव वानखेडे गेले उच्च न्यायालयात

Related

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांना एनसीबीचे अधिकारी यांच्याविरोधात टिप्पणी करण्यासाठी मनाई करणारा आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला होता.

ज्ञानदेव वानखेडे यांनी एकल खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या त्यांच्या अपीलावर तातडीने सुनावणी घेण्याचा उल्लेख केला असून लवकरात दिलासा देण्याची विनंती न्यायमूर्ती एस जे काथावाला आणि मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाला केली आहे.

हे ही वाचा:

औरंगाबादमध्ये लसीकरण प्रमाणपत्र दाखवा, मगच वस्तू विकत घ्या!

टोमॅटोने गाठली शंभरी!

नवी मुंबईतील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष मागत होता खंडणी, गुन्हा दाखल

आयसीस काश्मीरकडून गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी

त्यांच्या याचिकेवर गुरुवारी खंडपीठात सुनावणी होण्याची शक्यता आहे. सोमवारी, न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने राज्याचे मंत्री मलिक नवाब यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात वानखेडे यांना कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता.

ज्ञानदेव वानखेडे यांनी अंतरिम दिलासा म्हणून समीर वानखेडे किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध कोणतीही बदनामीकारक विधाने किंवा ट्विट, सोशल मीडिया पोस्ट आदी करण्यास नवाब मलिकांना मनाई करावी, अशी मागणी केली होती. न्यायमूर्ती जामदार यांनी नवाब मलिक यांच्यावर अशा प्रकारची बंदी घालणे शक्य नसल्याचे मत व्यक्त केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,516अनुयायीअनुकरण करा
4,940सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा