31 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरराजकारणआम्हाला जगू द्या, मारू नका! म्हणण्याची वेळ आली पुण्यातल्या शिवसेनेवर

आम्हाला जगू द्या, मारू नका! म्हणण्याची वेळ आली पुण्यातल्या शिवसेनेवर

Google News Follow

Related

शिवाजी आढळराव पाटील यांनी पदर पसरला

महाविकास आघाडीतील कुरबुरी हा नवा विषय नाही. पण या महाविकास आघाडीतील शिवसेनेला मात्र आता आपल्या अस्तित्वासाठी पदर पसरून गयावया करावी लागते आहे. पुण्यातील शिवसेनेला संपवू नका, आम्हाला जगू द्या अशी साद पुण्यातील शिवसेनेचे खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी घातली आहे. ही साद घालतानाच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावरही शरसंधान केले आहे.

दोन वर्षांपूर्वी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत बंधन बांधले आणि या दोन पक्षांसह सत्तेचा उपभोग घेण्यासाठी राज्यात सरकार आणले. मात्र तेव्हापासून या तीन पक्षांत कुरबुरी असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळाले आहे.

आढळराव पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी आम्ही मान्य केली आहे, आम्ही आघाडीची तत्त्वे पाळत आहोत. पण शिवसेना संपविण्याचा डाव पुण्यात खेळला जात आहे. आमचे अस्तित्व राहू द्या. शिवसैनिकाला सुखाने जगू द्या, एवढीच आमची मागणी आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटले आहे की, गृहमंत्र्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आमचे अस्तित्व राहू द्या. आम्हाला मारू नका. आम्ही कुणाच्याही नादी लागत नाही. वरिष्ठांच्या कानावर आम्ही वेळोवेळी या गोष्टी सांगत आहोत.

हे ही वाचा:

भाजप नेते आर. एन. सिंह यांचे निधन

कोरोनामुळे २ हजार प्रवाशी क्रूझवर अडकले

‘मुंबई क्रिकेटची दुसरी फळी तयार करण्यात निवड समिती अपयशी’

फुटबॉलपटू मेस्सीला कोरोनाने गाठले

 

लांडेवाडी येथे होणाऱ्या बैलगाडी शर्यत रद्द करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. पण आम्ही ही बैलगाडा शर्यत आयोजित केली म्हणून अनेकांच्या डोळ्यात ती सलू लागली. हे कारस्थान विरोधक आणि प्रशासनाने केले.

खेडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत वादंग सुरू झाले आहेत. खेडच्या राष्ट्रवादी आमदाराबाबत आढळराव पाटील यांनी आरोप केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा