25 C
Mumbai
Monday, January 17, 2022
घरक्राईमनामामुस्लीम महिलांचा लिलाव करणाऱ्या ऍपमुळे खळबळ

मुस्लीम महिलांचा लिलाव करणाऱ्या ऍपमुळे खळबळ

Related

सहा महिन्यांपूर्वी गिटहब (Github) नावाच्या एका मोबाईल ऍपवर मुस्लीम महिलांचे फोटो पोस्ट करून त्याबाबत आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यावर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला आहे. शनिवार १ जानेवारी रोजी काही मुस्लीम महिलांचे सोशल मीडियावरील फोटो ‘बुल्ली बाई’ या ऍपवर अपलोड करून त्यावर अश्लील भाषेत आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला होता. तसेच महिलांचा लिलाव करण्याची भाषा देखील या मजकुरामध्ये करण्यात आली होता. त्यानंतर अनेक जणांनी यासंबंधी पोलिसांकडे तक्रार केली.

गिटहबवर ‘सुल्ली डील्स’ प्रमाणे ‘बुल्ली बाई’ नावाचा एक गट तयार करण्यात आला आहे, जो मुस्लिम महिलांचे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून गोळा करून लोकांना त्यांच्या लिलावात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतो, असे एका महिला पत्रकाराने म्हटले आहे. तिचा फोटो यासाठी वापरण्यात आल्याचे तिच्या लक्षात आले, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, गिटहबने गुन्हेगाराचे खाते ब्लॉक केले असून आणि पोलिस आणि संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक (CERT) या प्रकरणाचा तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

भाजप नेते आर. एन. सिंह यांचे निधन

कोरोनामुळे २ हजार प्रवाशी क्रूझवर अडकले

‘मुंबई क्रिकेटची दुसरी फळी तयार करण्यात निवड समिती अपयशी’

आम्हाला जगू द्या, मारू नका! म्हणण्याची वेळ आली पुण्यातल्या शिवसेनेवर

काही महिन्यांपूर्वी सुली डील्स या नावाने गिटहबवर मुस्लीम महिलांचे फोटो टाकून आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करण्यात आल्याचे उघड झाले होते. त्यानंतर हा मजकूर हटवण्यात आला होता. सुली हा शब्द मुस्लीम महिलांचा अपमान करण्यासाठी वापरला जातो. त्यावरून मोठा वाद झाला होता. या प्रकरणावर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत भाष्य केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,582अनुयायीअनुकरण करा
5,710सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा