32 C
Mumbai
Thursday, December 11, 2025
घरराजकारणसत्यजित तांबे यांनी सोशल मीडियातून काँग्रेसचा 'हात' हटवला

सत्यजित तांबे यांनी सोशल मीडियातून काँग्रेसचा ‘हात’ हटवला

प्रोफाइलवरून पक्षाचं नाव आणि लोगो काढून टाकला

Google News Follow

Related

नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूक होण्याच्या आधीच रंगतदार ठरत आहे. रोज नवनवीन नाट्यमय घडामोडी घडत आहे. डॉ. सत्यजित तांबे यांनी या निवडणुकीसाठी काँग्रेसला विश्वासात न घेता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षाचा आदेश असतानाही उमेदवारी अर्ज भरू न शकल्याने काँग्रेसने रविवारी नेते सुधीर तांबे यांना निलंबित केले.

सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याऐवजी त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांना नाशिक विभागातील पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे आता सत्यजित तांबे यांच्यावरही काँग्रेस कारवाई करणार का असा प्रश उपस्थित केला जात आहे. परंतु डॉ. तांबे यांनी त्याआधीच आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलवरून त्यांनी पक्षाचं नाव आणि लोगो काढून टाकला आहे .

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. पक्षाने त्यांना एबी फॉर्म देखील दिला होता. पण सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याऐवजी ऐनवेळी आपला सत्यजित यांना नाशिक विभागातील पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून रिंगणात उतरवले आहे. डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेस नेतृत्वाला अंधारात ठेवून दगाफटका केल्याचा आरोप करत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी डॉ.सुधीर तांबे यांना निलंबिट केले. त्यामुळे सत्यजित तांबे यांच्यावरही निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती.

हे ही वाचा:

पाकिस्तानचे डोळे उघडले? म्हणतात, भारताशी तीन युद्धे केल्यामुळे झालो गरीब

जोशीमठमधील हॉटेलनंतर आता घरे पाडण्याचा निर्णय

पाकिस्तानात १३ वर्षांच्या हिंदू मुलींना पळवून होत आहेत विवाह, धर्मांतरण

महाराष्ट्राला मिळाली भरभक्कम गुंतवणूक

डॉ. सत्यजित तांबे यांनी सोशल मिडियावरील आपले प्रोफाइल बदलले आहे. त्याच प्रमाणे ट्विटर डीपी आणि बायोमधून काँग्रेस पक्षाचा उल्लेख काढून टाकला आहे. सत्यजित तांबे यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटरच्या कव्हर पेजवर एक संदेश लिहिला आहे. .त्यामुळे पक्षाकडून कारवाई होण्याच्या आधीच डॉ. तांबे यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिल्याचे दिसून येत आहे. नाना पटोले यांनी ३० जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवाराला पक्ष अधिकृतपणे पाठिंबा जाहीर करेल, असे म्हटले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा