32 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
घरक्राईमनामाअनिल परबांनी मुरुड ग्रामपंचायतीला लिहिलेलं पत्र ईडीच्या हाती

अनिल परबांनी मुरुड ग्रामपंचायतीला लिहिलेलं पत्र ईडीच्या हाती

Google News Follow

Related

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गुरुवार, २६ मे रोजी अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर ईडीने धाड टाकली होती. मुंबई, पुणे, रत्नागिरी इथल्या एकूण सात ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली होती. दरम्यान, दापोलीमधील साई रिसॉर्ट प्रकरणाच्या संबंधित कागदपत्रे आता ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

अनिल परब यांनी २६ जून २०१९ रोजी लिहिलेलं पत्र ईडीच्या हाती लागले आहे. दरम्यान, छापेमारीदरम्यान दापोलीमधला रिसॉर्ट आपला नसल्याचा दावा अनिल परब यांनी केला होता. विशेष म्हणजे ईडीच्या हाती लागलेलं पत्र हे कर आकारणीसंबंधी असल्याची माहिती समोर आली आहे. अनिल परब यांनी साई रिसॉर्टशी आपला काहीही संबंध नाही असे वक्तव्य वारंवार केले होते. मात्र, आता ईडीच्या हाती मूळ कागदपत्रे लागल्याने अनिल परबांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

हे ही वाचा:

‘रोहित पवारांनी असले धंदे बंद करावेत’

…तर १९४७ची परिस्थिती पुन्हा निर्माण होईल!

यासिन प्रकरणावरून टीका करणाऱ्या इस्लामिक परिषदेला भारताने ठणकावले

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या २१ गोष्टींचे अभिवाचन

मुरुड ग्रामपंचायतमध्ये अनिल दत्तात्रय परब यांच्या नावाने ४६ हजार ८०० रुपये कर भरल्याचा पुरावा ईडीच्या हाती लागला आहे. रितसर अर्ज करुन मुरुड ग्रामपंचायत कार्यलयामध्ये जाऊन ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती मिळवली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत साई रिसॉर्टच्या संबंधीत काही कागदपत्रे सादर केली होती. या सर्व कागदपत्रांच्या प्रती अधिकृतपणे ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,851चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा