31 C
Mumbai
Sunday, June 4, 2023
घरक्राईमनामाजयंत पाटलांना ईडीची नोटीस, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

जयंत पाटलांना ईडीची नोटीस, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अडचणीत वाढ

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जयंत पाटील यांना ईडीने नोटीस बजावली आहे. सोमवारी ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश नोटीसमधून देण्यात आल्याची माहिती आहे. आयएल आणि एफएस (IL & FS) प्रकरणी जयंत पाटलांना नोटीस बजावण्यात आली आहे.

आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून अनेकांनी आर्थिक मोठा गैरव्यवहार केल्याचा असल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी जयंत पाटील यांनाही समन्स बजावण्यात आले आहे. या प्रकरणात सर्वप्रथम दिल्लीतील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती पाहता हे प्रकरण ईडीकडे सोपवण्यात आले होते. मात्र, ईडीने नोटीस पाठवल्याच्या वृत्तावर जयंत पाटील यांनी मात्र अद्याप अशी कोणती नोटीस मिळाली नसल्याचं म्हटलं आहे.

हे ही वाचा:

सचखंड श्री हरमंदिर साहिबजवळ स्फोट घडवणाऱ्या पाच जणांना अटक

अदानींवरील हिंडेनबर्गच्या आरोपांच्या ठिकऱ्या; मॉरिशसच्या मंत्र्यांचे स्पष्टीकरण

इम्रान खान यांना आठ दिवसांची एनबी कोठडी

इस्लाम कबूल न केल्यामुळे पत्नीची केली हत्या

प्रकरण काय आहे?

आयएल आणि एफएस या कंपनीच्या व्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू होती. कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,021अनुयायीअनुकरण करा
76,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा