29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरराजकारणलालूप्रसाद यादव आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर १५ ठिकाणी छापे

लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर १५ ठिकाणी छापे

नोकऱ्यांच्या बदल्यात जमीन घोटाळा प्रकरणी कारवाई

Google News Follow

Related

ईडी अर्थात  अंमलबजावणी  संचालयाने आज दिल्ली, बिहार  आणि पाटणा येथे छापे टाकण्यात आले आहेत. नोकरीसाठी जमीन घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी बिहारमधील अनेक शहरांमध्ये  अंमलबजावणी संचालनालय  शोध आणि छापे टाकत आहेत. लालूप्रसाद यादव यांच्या मुलींच्या घरी दिल्लीमध्येही हे छापे टाकले आहेत. शिवाय राजदचे माजी आमदार के.अबू. दोजाना यांच्या पाटणा इथल्या घरी सुद्धा छापेमारी केली आहे. दिल्लीत फ्रेंड्स कॉलनीत बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या घरीही छापा टाकण्यात आला आहे. माजी आमदार अबू दोजाना हे बांधकाम व्यावसायिक असून ते लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय आहेत. ‘जमिनीच्या बदल्यात नोकरी’ या प्रकरणी  लालूप्रसाद  यादव यांच्या अडचणी वाढत आहेत.

सीबीआयच्या पथकाने दोनच दिवसांपूर्वी लालूप्रसाद यादव यांची दिल्लीत चौकशी केली होती. हेमा, चंदा आणि रागिणी या लालू यादव यांच्या मुलींच्या घरी दिल्लीत असून ईडीचे पथक तिथे आहे. याशिवाय लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्या दिल्लीतील घरी सुद्धा ईडीचे पथक पोचले असून त्यांची चौकशी सुरु आहे. आज ईडीचे पथक पहाटेच अबू दोजाना यांच्या घरी पोहोचले आहे. सध्या या पथकाचे अधिकारी  त्यांच्या घरी असून त्यांनी कोणालाही बाहेर जाण्यास मनाई केली आहे.

काय आहे नोकरीसाठी जमीन प्रकरण ?

लालूप्रसाद यादव रेल्वे मंत्री असताना २००४ ते २००९ मध्ये ‘लँड फॉर जॉब’ हा घोटाळा झाला होता. लालू यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कथितपणे जमिनी भेट म्हणून किंवा कवडीमोल भावाने विकण्याच्या बदल्यात रेल्वेत नोकरी दिल्याचा आरोप आहे. सीबीआयने लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडीदेवी यांच्यासह १४ जणांविरोधात गुन्हेगारी कट आणि भ्र्ष्टाचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत आरोपपत्र दाखल केले आहे.

या सर्व आरोपींना १५ मार्च रोजी समन्स बजावण्यात आले आहे. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या फौजदारी कलमांतर्गत नोंद केली आहे. सीबीआयच्या तपासानंतर या प्रकरणात ईडी चाही सहभाग असल्याचे कळत आहे. पाटणाची राजधानी फुलवारी शरीफ भागांतील हारून नगर मध्ये ईडीची छापेवारी सुरु आहे. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी हा छापा टाकण्यांत येत आहे.

हे ही वाचा:

आगामी निवडणुकांसाठी पंचामृत!

पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती ‘सावित्रीबाई फुले’ यांना शतशः नमन

नागालँडमध्ये पवारांनी केली त्याच रणनीतीची पुनरावृत्ती

अर्थसंकल्पावरील चर्चेत सत्ताधारी – विरोधक भिडणार

दरम्यान, दिल्लीच्या राऊज अवेन्यू कोर्टाने २७ फेब्रुवारीला आर जेडी सुप्रीमो लालूप्रसाद यादव, माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी, मिसा भारती हि मोठी मुलगी यांना समन्स बाजवले आहे. जमिनीच्या बदल्यात नोकरी दिल्याप्रकरणी न्यायालयाने सीबीआयच्या आरोपपत्रावर समन्स बजावले आहे. यात सगळ्यांना १५ मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा