29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरक्राईमनामाराणा आयुब यांना विमानतळावर अडवले! १ एप्रिलला होणार ED चौकशी

राणा आयुब यांना विमानतळावर अडवले! १ एप्रिलला होणार ED चौकशी

Google News Follow

Related

पत्रकार राणा आयुब लंडनला जात असतानाच त्यांना मुंबई विमानतळावर अडवण्यात आले आहे. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या अधिकाऱ्यांनी राणा हीला मुंबई विमानतळावर रोखले. राणा आयुब यांना १ एप्रिल रोजी ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. विमानतळावर रोखुन राणा यांना या चौकशी संदर्भातच समन्स बजावण्यात आले.

राणा आयुब या एका आंतरराष्ट्रीय पत्रकारिता समारंभात अध्यक्षीय भाषण करण्यासाठी लंडन येथे जात होत्या. पण विमानात दाखल होण्याआधीच त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी थांबवले आणि समन्स बजावले. आयुब यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली. मी लंडनला जात असल्याचे जाहीर केल्यानंतरही ईडीने मला थांबवले आणि मला थांबवल्यानंतर माझ्या इनबॉक्समध्ये समन्स आले असे आयुब यांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

आपल्या शरीरातही जाते या मार्गाने प्लास्टिक

मोहित कंबोज यांची मागणी; मशिदींवर बेकायदेशीर भोंगे हटवा!

जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफ कॅम्पवर पेट्रोल बॉम्ब हल्ला

शाळकरी विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी लांबणीवर!

राणा आयुब यांच्यावर झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांबद्दल तपास सुरू आहे. उत्तर प्रदेश मधील गाझियाबाद पोलीस स्टेशन मध्ये राणा आयुब यांच्याविरोधात पैशांच्या अफरातफरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास संकृत्यायन नावाच्या गृहस्थांनी हा गुन्हा दाखल केला आहे. ते गाझियाबादचे रहिवासी असून हिंदू आयटी सेल या सामाजिक संस्थेचे संस्थापक आहेत.

राणा आयुब यांनी कोविड काळात गरजवंतांना मदत करण्यासाठी केट्टो नावाच्या क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्मचा वापर करत २ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी जमा केला. २०२० आणि २०२१ या कालावधीत हा निधी जमा करण्यात आला. पण त्याचा गैरवापर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान केट्टो या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उभारलेल्या निधीचा योग्य विनियोग झाला असून प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवला आहे. एकही पैशाचा गैरव्यवहार झाला नाही असा आयुब यांचा दावा आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा