31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
घरराजकारणजसे कर्म तसे फळ.... कुमार विश्वास यांचा केजरीवाल यांना टोला

जसे कर्म तसे फळ…. कुमार विश्वास यांचा केजरीवाल यांना टोला

एक्सवर पोस्ट केलेल्या ओळींमधून टोला मारल्याच्या चर्चा

Google News Follow

Related

दिल्लीचे मुख्यंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात गुरुवार, २१ मार्च रोजी अटक करण्यात आली आहे. ईडीने गुरुवारी दहाव्या समन्सनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. अशातच केजरीवाल यांच्या अटकेनंतर त्यांचे जुने सहकारी आणि आम आदमी पार्टीचे माजी नेते कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

कुमार विश्वास यांनी गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानसच्या ओळी पोस्ट केल्या आहेत. कर्म प्रधान विश्व रचि राखा। जो जस करहि सो तस फल चाखा॥ अशा ओळी त्यांनी पोस्ट केल्या आहेत. हे विश्व कर्म प्रधान आहे, जी व्यक्ती जसे करते, तिला तसे फळ मिळते, असा त्याचा अर्थ होतो. या ओळींच्या माध्यमातून कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांना अटकेवरून निशाणा साधल्याच्या चर्चा आहे. कुमार विश्वास आणि अरविंद केजरीवाल हे आंदोलनातील सहकारीही होते.

हे ही वाचा:

ऐतिहासिक यश; इस्रोच्या ‘पुष्पक’ची यशस्वी चाचणी!

चॅट जीपीटी म्हणतं, यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई आणि मुंबईचा संघ चमकणार

केंद्राने रोहिंग्यांना राहण्याचा अधिकार नाकारला

केजरीवाल यांना वाटू लागली अटकेची भीती!

गेल्या अनेक दिवसांपासून ईडीकडून अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरू होती. तसेच, त्यांना चौकशीकरता ईडी कार्यालयात बोलावण्यात आले होते. तब्बल ९ वेळा समन्स बजावण्यात आले होते. परंतु, प्रत्येकवेळी अरविंद केजरीवाल यांनी ईडी कार्यालयात जाणं टाळलं. अटकपूर्व जामीनासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, अटकेतून दिलासा देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर त्यांना गुरुवारी रात्री अटक करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा