30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरराजकारण'मुंबई महानगरपालिका ही तर मविआसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी!

‘मुंबई महानगरपालिका ही तर मविआसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी!

Google News Follow

Related

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचून दाखवला आहे. फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या कारभावर टीका करत शिवसेनेवर निशाणा साधला. हे सरकार महाविकास आघाडी नसून महाविनाश आघाडी सरकार आहे. ठाकरे सरकार मुंबईला काहीतरी देण्याऐवजी फक्त लुटण्याचे काम करत आहे. मुंबई महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार असून माविआ याला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजते, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी माविआ सरकारवर केली आहे.

ठाकरे सरकारच्या कोविड सेंटरच्या घोटाळ्यापासून ते सफाई कामगारांच्या घोटाळ्यांपर्यंतचा पाढा फडणवीसांनी विधानपरिषदेत वाचून दाखवला आहे. जे कंत्राटदार पुण्यात काळ्या यादीत आहेत त्याच कंत्राटदाराला मुंबईमध्ये पाच कोविड सेंटरचे काम पालिकेने दिले. ठाकरे सरकारने मृतांच्या टाळूवरील लोणी खाल्ले, अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबईमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. मुंबई महापालिकेत जे सत्ता चालवत आहेत ते महापालिकेला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजतात. मुंबई देशात श्रीमंत महापालिका आहे ज्याचा देशात आठवा क्रमांक लागतो. त्याच मुंबईचा फायनान्शियल रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये ४५ वा क्रमांक लागतो. या आकडेवारीत नागपूर, नवी मुंबई, पुणे हेसुद्धा मुंबईपेक्षा पुढे आहेत. अशाप्रकारे ठाकरे सरकार महापालिकेचं बजेट लुटून नेण्याचं काम करत आहे, असेही फडणवीस म्हणाले.

पुण्यात काळ्या यादीत टाकलेल्या कंपनीला मुंबईच्या कोविड सेंटरचे कंत्राट पालिकेने दिले. या कंत्राटाची कागदपत्रे पाच दिवसात तयार केलीत. मात्र, या कागदपत्रात स्टॅम्प पेपर जुने आहेत. अनुभव नसलेल्या लोकांना पालिकेने काम दिले. अजित दादा तुम्ही पुण्यातून पंधरा दिवसात हाकललेल्यांना मुंबईत कंत्राट दिलंत. पण यावर कोणती कारवाई होताना दिसत नाही, असा हल्लाबोल फडणवीस यांनी माविआवर केला आहे.

पुढे फडणवीस म्हणाले, सफाई कामगारांच्या नावावर ठाकरे सरकारने आपल्या तिजोऱ्या भरल्या. फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल करत त्यांनी महाविकास आघाडी म्हणजे आम्हाला नंतर समजले ही तर महाविनाश आघाडी आहे. नंतर कळालं ही महावसुली आघाडी आणि आता तर मद्य विक्री आघाडीच म्हणावी लागेल. अनिल अवचट यांनी आयुष्यभर व्यसनमुक्तीच काम केले. त्या अनिल अवचट यांचे निधन झाल्यानंतर लगेचच महाविकास आघाडीने त्यांना सकाळी श्रद्धांजली वाहिली आणि दुपारी किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय घेतला. मुंबई मेली तरी चालेल, पण आम्ही आमच्या तिजोऱ्या भरणार, असा निर्धारच ठाकरे सरकरने केला आहे.

हे ही वाचा:

…आणि पंतप्रधान मोदींनी केली चित्रकार आयुषची इच्छा पूर्ण

त्याची लाकडी ट्रेडमिल पाहून ‘आनंद’ झाला!

वानखेडे स्टेडियम, हॉटेलची अतिरेक्यांकडून रेकी नाही!

योगी आदित्यनाथ घेणार दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ

मुंबई महापालिकेत स्थायी समितीच्या अध्यक्षांकडे सुरुवातीला १३० कोटींची संपत्ती सापडली. आता ती संपत्ती ३०० कोटीपर्यंत पोहोचली आहे. कोरोनाने लोक मरत होते. पण यांनी २४ महिन्यात ३८ संपत्ती खरेदी केली आहे. पालिकेत फक्त स्वतःची तिजोरी भरण्याचे काम सुरु आहे, अशा शब्दांत ठाकरे सरकारला धारेवर धरले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा