27 C
Mumbai
Saturday, September 14, 2024
घरराजकारणफडणवीसांचे मराठा समाजावर अनंत उपकार, जरांगेनी नौटंकी बंद करावी!

फडणवीसांचे मराठा समाजावर अनंत उपकार, जरांगेनी नौटंकी बंद करावी!

भाजप नेते प्रसाद लाड यांचे वक्तव्य

Google News Follow

Related

राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या १० टक्क्याच्या आरक्षणावर मराठा आंदोलक मनोज जरांगे समाधानी नाहीयेत.जरांगे यांच्या दोन प्रमुख मागण्या होत्या.त्यातील एक म्हणजे मराठा समाजातील ज्यांच्या कुणबी म्हणून नोंदी आहेत त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे.तर उर्वरित मराठा समाजाला सगेसोयऱ्यांच्या मदतीने ओबीसी दाखला देण्यात यावे.मनोज जरांगे यांच्या मागणीवर राज्य सरकारने ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना ओबीसी दाखले देण्याचे मान्य केले.तर उर्वरित मराठा समाजासाठी १० टक्क्याच्या आरक्षणाची तरतूद करण्यात आली.राज्य सरकारकडून देण्यात आलेलं आरक्षण हे जरांगे यांना मान्य नसून त्यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले.

सगेसोयऱ्यांना ओबीसी मधून आरक्षण न दिल्यामुळे मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत रोष व्यक्त केला .मराठा समाजाला सरसकट ओबीसी दाखला न देण्याचा डाव हा उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आणि मुंबईतील उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे रवाना झाले.दरम्यान, मनोज जरांगे यांची खेळी सर्व समाजापुढे आल्याचे भाजप नेते प्रसाद लाड म्हणाले.तसेच उपमुख्यमंत्री फडणवीसांचे मराठा समाजावर अनंत उपकार असून जरांगेनी आता नौटंकी बंद करावी, असे प्रसाद लाड म्हणाले आहेत.

हेही वाचा..

मायावतींना फटका, खासदार रितेश पांडेंचा भाजपात प्रवेश!

सागर बंगल्यापर्यंत पोहचण्याअगोदर आमची भिंत पार करा!

२९ फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित; दिल्लीच्या सीमा अंशतः खुल्या

दोन हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा मास्टरमाइंड तामिळ चित्रपट निर्माता

भाजप नेते प्रसाद लाड म्हणाले की, मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद पहिली.आता त्यांची नौटंकी त्यांनी बास करावी.समाजाच्या नावाखाली मागच्या सात-आठ महिन्यात स्वतःचा राजकीय वरदस्त करण्याचा प्रयत्न जो मनोज जरांगे पाटील करत होते.त्याचा मागचा बोलवता धनी कोण आहे ते त्यांनी सांगावे, सिल्वर ओक मधील आहे? की जालन्यामधील भैया फॅमिली आहे.आणि हे आता खर-खर लोकांसमोर यायला लागले आहे.दुसरे म्हणजे तुम्हाला दहा वेळा सांगितले होते की, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे नाव घेऊ नका.या फडणवीसांचे मराठा समाजावर अनंत उपकार आहेत.त्या फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, फडणवीसांचे सारखं-सारखं नाव कोण घ्यायला लावतंय, हे आज जनतेसमोर आले आहे.

ते पुढे म्हणाले की, पुन्हा एकदा मराठा समाजाला १० टक्के आरक्षण मिळाल्यानंतर आपली खेळलेली खेळी संपली, हे आजच्या तुमच्या पत्रकार परिषदेमधून तुमची परिस्थिती लक्षात येते.तुमचं दुःख लक्षात येतंय.त्यामुळे समाजाच्या नावावर लेकरू-लेकरू करून ढेकरू देण्याचं काम बंद करा.समाजाला माहिती पडलेलं आहे की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले आहे.समाज खुश आहे.तुमच्या आजून आईडियाच्या आणि अडवाईजची समाजाला गरज नाहीये, असे भाजप नेते प्रसाद लाड म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा