29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरदेश दुनियाफडणवीसांनी प्रियांकांना झापले!

फडणवीसांनी प्रियांकांना झापले!

Google News Follow

Related

सातत्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात काहीतरी वक्तव्य करून नकारात्मक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न गांधी परिवाराकडून सुरू असतो. पण हीच काँग्रेस आणि गांधी परिवार आपल्या पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांतील भीषण परिस्थितीबद्दल अजिबात चिंता व्यक्त करत नाहीत, अशा शब्दांत महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रियांका गांधी यांनी दिलेल्या एका मुलाखतीची चिरफाड करत त्यांना झापले.

काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी एका मुलाखतीत भारतात ऑक्सिजनचा तुटवडा कसा भासतो, ऑक्सिजनचे उत्पादन होत असतानाही त्याचा पुरवठा का होत नाही, ११ लाख रेमडेसिवीर इंजेक्शन्स तयार करण्यात आले तरी त्याचा तुटवडा कसा निर्माण झाला, असे प्रश्न विचारले. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले.

प्रियांका यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सणसणीत उत्तर देताना फडणवीस म्हणतात, काँग्रेस आणि गांधी परिवार ठरवून देशात एक नकारात्मक वातावरण तयार करत आहे. मी प्रियांकांना विचारू इच्छितो की, या गोष्टींची चर्चा त्यांनी कधी राज्यांतील काँग्रेस सरकारांशी केली का ?  ज्या गोष्टींबद्दल त्या बोलतात त्या गोष्टी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दिसतात. देशातील जे करोनाचे मृत्यु झाले आहेत, त्यातील ३८ ते ४० टक्के मृत्यू हे महाराष्ट्रात आहेत. रुग्णांची सर्वाधिक संख्याही महाराष्ट्रात आहेत. देशातील ३५-३७ टक्के अॅक्टिव्ह रुग्णही रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मागच्या लाटेतही महाराष्ट्रात जास्त रुग्ण होते. तेव्हा  प्रियांका, राहुल, मनमोहन यांनी ही चिंता का व्यक्त केली नाही? हे सल्ले त्यांनी महाराष्ट्राला का दिले नाहीत. नोव्हेंबरमध्ये मुंबईतील चाचण्या सरासरी १२ हजार आहेत, डिसेंबर १४ हजार आहेत. मागील सात दिवसांत मात्र सरासरी चाचणी ४५ हजार आहे. १८ टक्के बाधित आहेत. २ कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत केवळ ४५ हजार चाचण्या होत असतील तर रुग्णांची संख्या लपविली जात आहे याची शंका येते. महाराष्ट्रासारख्या राज्यात ७-१० दिवस रिपोर्ट यायला लागत आहेत. बेड्स नाहीत, ऑक्सिजन बेड्स नाहीत, व्हेन्टिलेटर्स नाहीत. सोनियाजी, प्रियांकाजींच्या काँग्रेसचे सरकार या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात या सरकारचे अस्तित्वच दिसत नाही. म्हणून त्यांनी हा सल्ला महाराष्ट्राला द्यायला हवा होता. जर महाराष्ट्रातील हे आताचे आकडे बाजुला काढले तर देशातील करोनाची स्थिती कमी आहे असेच दिसेल. खरे तर, महाराष्ट्रातील रुग्णांचे आकडे त्यात मिळविले तर देशाची तुलना प्रमुख करोनाबाधित देशांशी होऊ लागते. मला वाटते आपले अपयश विचारात घेतले असते तर असा नकारात्मक विचार त्यांनी केला नसता. छत्तीसगडमध्ये काय परिस्थिती आहे? गेल्या सात दिवसांत मृत्युदर तीन पटीने वाढला आहे. मी आकड्यांचा खेळ करू इच्छित नाही. पण जो नकारात्मक विचार करतात, तो आपले अपयश झाकण्यासाठी करत आहेत. असे राजकारण उचित नाही.

हे ही वाचा:

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीचा भयंकर प्रकार; रुग्ण दगावल्याची भीती

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीची भयंकर घटना, २२ रुग्णांचा तडफडून मृत्यू

राज्याचा आरोग्यमंत्री इतका असंवेदनशील कसा असू शकतो?

नाशिक मनपा रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची राष्ट्रीय स्तरावर दखल

रेमडेसिवीरसंदर्भात प्रियांका यांनी केलेल्या वक्तव्याला तोडीसतोड उत्तर देताना फडणवीस म्हणतात, रेमडेसिवीर हे पेटंटेड ड्रग आहे. आपण त्या इंजेक्शनचे उत्पादक आहोत आणि त्यांची निर्यात करत होतो. केंद्राने देशातील या इंजेक्शनची वाढती गरज लक्षात घेता निर्यातीवर बंदी आणली आणि भारतात ती उपलब्ध होतील याची काळजी घेतली. प्रियांका ज्या ११ लाख रेमडेसिवीरबद्दल बोलतात, देशात सात दिवसांत दीड लाखांपासून ३ लाखांपर्यंत उत्पादन वाढविले. मोदीजींच्या नेतृत्वाखाली ही अभूतपूर्व कामगिरी केली आहे. ११ लाख निर्यात केले कसे हे विचारण्यापेक्षा रोज ३ लाख इंजेक्शन्स तयार होत आहेत, हे त्यांनी बोलायला हवे होते. रेमडेसिवीर हे आपल्याकडे निर्यातीसाठीच बनविले जात होते. हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे होते.

ऑक्सिजनच्या पुरवठ्यासंदर्भात सविस्तर विवेचन करताना फडणवीस यांनी सांगितले की, ऑक्सिजनची परिस्थिती बघून पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली क्षमता ११० टक्के उत्पादन वाढविले आहे. उद्योगातील ऑक्सिजन निर्मिती रोखून तो वैद्यकीय क्षेत्रासाठी उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्राला इतर राज्यांकडून सर्वाधिक ऑक्सिजन मिळेल अशी व्यवस्था केंद्राने केली आहे. सात दिवसांत भारताने ऑक्सिजन एक्स्प्रेस तयार केली, हे प्रियांकाना दिसत नाही का? ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेच्या माध्यमातून केले तर आपल्या वेळेची बचत होईल आपली क्षमता दोनशे टक्के वाढते, हे सात दिवसांत करून दाखविले. त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पियुष गोयल यांचे मनापासून अभिनंदन करीन. मी प्रियांका गांधीना विचारू इच्छितो, की जिथे काँग्रेसची राज्ये आहेत तिथे ऑक्सिजनचे प्लांट्स लागतील असा प्रयत्न त्यांनी केला का ? या साथीत मागील वर्षी महाराष्ट्रात ऑक्सिजनची कमतरता भासणार हे लक्षात आले होते. बजेटमध्येही ठाकरे सरकारने त्यासाठी विशेष तरतूद केल्याचे सांगितले. पण कोणताही पैसा दिला नाही. आज कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात किंवा आरोग्य संस्थात व्यवस्था नाही. इतक्या मोठ्या लाटेत महाराष्ट्रात पायाभूत सुविधा वाढवल्या का? मात्र केंद्राने २०१४ पासून आपण आरोग्यव्यवस्थेत वाढ केली. २०१४-१५ मध्ये ३८१ वैद्यकीय महाविद्यालये होती, आता त्यांची संख्या ५६५ झाली आहेत. ५० टक्के वाढ झाली. अंडरग्रॅज्युएट ५७ टक्के वाढ, पोस्ट ग्रॅज्युएट ६९ टक्के जागांमध्ये वाढ झाली. देशांत १५ AIIMS काम करत आहेत. आज आपण पायाभूत सुविधां उभारू पण डॉक्टर्स कुठून आणणार. आज मोदींजींच्या द्रष्टेपणामुळे डॉक्टरांची संख्या वाढली. नाहीतर आज काय अवस्था झाली असती? प्रियांकाना हा प्रश्न विचारू इच्छितो की, इतकी वर्षे आपले सरकार होते, आपण किती डॉक्टर्स तयार केले. किती वैद्यकीय महाविद्यालये उभी केलीत. मोदीजींनी तेच काम पाच वर्षांत करून दाखविले.

लसीच्या बाबत काँग्रेसने केलेल्या राजकारणाला हास्यास्पद ठरवत फडणवीस यांनी सांगितले की, मला काँग्रेसला प्रश्न विचारायचा आहे. देशात लस तयार होणार असे आपण म्हणत होतो तेव्हा हेच लोक त्यावर हसत होते. भारतीय कंपन्यांनी जेव्हा लस तयार केली तेव्हा हेच काँग्रेसपक्षाचे लोक होते, जे लस आम्ही घेणार नाही म्हणत होते. त्याची चेष्टा उडवण्यात आली. पण आपल्या क्षमतेचे कौतुक इतर देशांनी केले. १२ कोटींचे लसीकरण आपण केले आहे. केंद्र सरकारने ७० कोटी लसनिर्मितीची तयारी केली आहे. आपण त्यांचे उत्पादन करत आहोत, उत्पादकांनाही परवानगी दिली आहे. विदेशी लसीपैकी काही -१७ अंश सेल्सियसला ठेवावे लागते. पण आपल्या लसी भारतीय हवामानाचा विचार करून उत्पादन केल्या गेल्या आहेत. त्यामुळेच एवढे मोठे कार्य करता आले. प्रियांकाजी ज्या एवढ्या लसीसंदर्भात तावातावाने बोलतात, पण त्यांचा लस घेतानाचा फोटो आम्ही बघितला नाही. त्यांनी घेतली आहे का लस? कोणत्या कंपनीची लस घेतली आहे? घेतली असेल तर नक्कीच आनंद आहे. गांधी परिवार, काँग्रेस पक्षाला देशातील लसीबद्दल आकस का आहे? आपली क्षमता असतानाही देशातील लस नको, परदेशातील आणा असा हट्ट राहुल गांधी धरत होते. ते का?  आज आपल्या लसीने आपल्या देशाचे नाव मोठे केलेच, पण आपल्या १३५ कोटी जनतेसाठी एवढ्या प्रमाणात कोणताही देश लस उपलब्ध करून देऊ शकला नसता. मला वाटते, पंतप्रधान मोदींचे यासाठी आभार मानायला हवेत. त्यावर राजकारण नको.

करोनाच्या या काळात निवडणूक सभा नको म्हणून ओरड करणाऱ्या काँग्रेसला फडणवीस यांनी सुनावले. ते म्हणाले, राहुल गांधी केरळमध्ये काय करत होते. मुलांसमवेत होते आणि सभाच घेत होते ना?  आम्ही त्यांचे व्हीडिओ बघितले. बंगालमध्ये आता त्यांचे अस्तित्व उरले नाही तेव्हा ते अशी भूमिका घेतात की, बंगालमध्ये सभा नको. मग केरळमध्ये सभा घेतानाही करोना होताच. हीच परिस्थिती होती. याला दुटप्पीपणा म्हणतात.

प्रियांका गांधी म्हणतात की, विरोधी पक्षांशी केंद्र सरकार चर्चा करत नाही पण आयएसआयशी बोलते, त्यावरही फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, अशा प्रकारची वक्तव्ये करणे देशाच्या हिताचे नाही. आयएसआयशी आपण कधीही चर्चा करत नाही. त्यामुळे अशी वक्तव्ये करून आपल्या देशाला अपमानित करण्याचाच त्यांचा प्रयत्न आहे. मा. पंतप्रधान राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतात, मग सगळे मुख्यमंत्री काय भाजपचे आहेत का? काँग्रेस, कम्युनिस्ट पक्षाचेही आहेत. या सगळ्यांशी ते बोलतात तेव्हा ते विरोधी पक्षांशीच बोलत असतात ना. काँग्रेसचे म्हणणे असते ते हे की विरोधी पक्ष म्हणजे गांधी परिवार. जी काही चर्चा करायची ती गांधी परिवाराशी करा. तो आग्रह असेल तर प्रियांकाजी, राहुलजी, सोनियाजी यांनी आपल्या पक्षाचे संसदेतील नेते बनणे अपेक्षित आहे. तरीही त्यांना वाटते की, त्यांच्याशी संवाद व्हावा तर मोदीजींनी कधीही विरोध केला नाही. पण आपल्याला केवळ टीकाच करायची आहे. राजकारण करू नका असे म्हणायचे पण एक दिवशी राहुलजी, एकदा सोनियाजी,  एकदा मनमोहनजी हे सगळे राजकारणच करत असतात. मनमोहनजींचा नेहमीच आदर पंतप्रधानांनी केला आहे. त्यांच्या योग्य सूचनांचाही विचार केला आहे. मनमोहन राजकीय गोष्टी लिहित असतील तर त्याला उत्तर द्यावेच लागेल.

केंद्रावर आरोप करताना आपले अपयश झाकण्याचा प्रियांका यांचा प्रयत्न आहे, असे म्हणताना फडणवीस सांगतात की, महाराष्ट्र, दिल्ली वगैरे राज्य केंद्राकडे बोट दाखवतात कारण या राज्यांत गंभीर परिस्थिती आहे. या स्थितीत राज्य सरकार आपल्या अपयशाला लपवू इच्छिते तेव्हा केंद्र सरकारला कमी लेखण्याचा, अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र आज ते तोंडावर पडले आहेत. आपल्या अकार्यक्षमता लपविण्यासाठी केंद्राकडे बोट दाखविणे अयोग्य आहे. केंद्राने कधीही आमचे काम नाही असे कधीही म्हटलेले नाही. पंतप्रधानांनी मंगळवारी देशाला संदेश देताना लॉकडाउन हा अंतिम पर्याय आहे असे म्हटले होते, त्याबद्दल फडणवीस म्हणाले की, मागील लॉकडाउनदरम्यान आपल्याकडे मास्क, पीपीई किट, आरोग्य व्यवस्थाही पुरेशी नव्हती, त्यामुळे लॉकडाऊन करावा लागला. पण आता हे आपण लॉकडाउन करत असू तर अर्थव्यवस्थेचा प्राधान्याने विचार करावा लागेल. जे आर्थिकदृष्ट्या समर्थ आहेत त्यांना फारसा फरक पडणार नाही. पण जे गरीब आहेत, नोकरदार आहेत त्यांच्यावर लॉकडाउनचा परिणाम होतो. छोट्या, मध्यम व्यावासायिकांना केंद्राने २० लाख कोटींची मदत करून आधार दिला. पण प्रत्येक राज्य लॉकडाउन करू लागले तर या छोट्या उद्योगांची अवस्था वाईट होईल. तेव्हा लॉकडाउन हा अखेरचा पर्याय आहे, असे पंतप्रधान म्हणत आहेत, ते योग्यच आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा