34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरविशेषनाशिक मनपा रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची राष्ट्रीय स्तरावर दखल

नाशिक मनपा रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची राष्ट्रीय स्तरावर दखल

Google News Follow

Related

नाशिक मनपाच्या रुग्णालयातून ऑक्सिजनची गळतीच्या घटनेमुळे सारा देश हादरला आहे. त्यावरून विविध नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. त्याबरोबरच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीचा भयंकर प्रकार; रुग्ण दगावल्याची भीती

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीची भयंकर घटना, २२ रुग्णांचा तडफडून मृत्यू

सिरम इन्स्टिट्युटकडून लसींची किंमत जाहिर

गजा मारणे प्रकरणात माजी खासदार संजय काकडेंना अटक

नाशिक मनपाच्या रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे २२ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणाबाबत ट्वीट केले असून त्यात, दुर्दैवी मृत्यु झालेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याबरोबरच ही घटना अत्यंत हृदयद्रावक असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्वीटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी या प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्यांप्रती संवेदना व्यक्त करताना इतर रुग्णांच्या कुशल आरोग्यासाठी प्रार्थना देखील केली आहे.

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देखील ट्वीटरचा आधार घेत आपले दुःख व्यक्त केले आहे. त्याबरोबरच त्यांनी मृत्युमुखी पडलेल्यांच्या मित्रांना आणि नातेवाईकांना देवाने हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी अशी प्रार्थना केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माध्यमांकडे प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी देखील यात प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती लाभो अशी प्रार्थना केली आहे. त्याबरोबरच या घटनेची सखोल चौकशी तर करावीच, परंतु त्यासोबतच भविष्यात अन्यत्र कुठे अशी घटना घडू नये यासाठी काळजी घेण्याची विनंती देखील केली आहे. त्यासोबतच त्यांनी गरजूंना मदत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या घटनेबाबत एक व्हिडिओ प्रसृत केला आहे. ज्यात त्यांनी पुर्वी रुग्णालयात घडलेल्या अपघातांचा संदर्भ देत, या सर्वांची चौकशी झाली पाहिजे असे मत व्यक्त केले आहे.

भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी देखील ट्वीटरवरून या प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली तर वाहिली आहेच, परंतु या घटलेना मायनर म्हणणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर टीका देखील केली आहे. त्यात त्यांनी राजेश टोपे यांना असंवेदनशील म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा